शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या दहशतीने गाव रात्रभर जागे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 00:13 IST

सिन्नर : शहराजवळील सरदवाडीच्या ग्रामस्थांनी मंगळवारची रात्र जागून काढली. बिबट्याने गावात दोनदा शिरण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थ जागेच असल्याने आरडाओरड करून त्यांनी त्याला हुसकावून लावले. उग्र वासामुळे बिबट्या जवळपास असल्याची खात्रीशीर माहिती माहेरी आलेल्या महिलेने दिल्यानंतर ग्रामस्थांची चांगलीच धावपळ झाली.

ठळक मुद्देसरदवाडी । माहेरी आलेल्या विवाहितेच्या सतर्कतेने मिळाली बिबट्याची माहिती

सिन्नर : शहराजवळील सरदवाडीच्या ग्रामस्थांनी मंगळवारची रात्र जागून काढली. बिबट्याने गावात दोनदा शिरण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थ जागेच असल्याने आरडाओरड करून त्यांनी त्याला हुसकावून लावले. उग्र वासामुळे बिबट्या जवळपास असल्याची खात्रीशीर माहिती माहेरी आलेल्या महिलेने दिल्यानंतर ग्रामस्थांची चांगलीच धावपळ झाली.नाशिक - पुणे महामार्गावरील सिन्नर बायपासलगत व शहरापासून अवघ्या शंभर फूट अंतरावर असलेल्या सरदवाडी येथे बछड्यासह तीन बिबट्यांनी परिसरात दहशत निर्माण केली आहे. महिनाभरापासून बिबट्याचा परिवार सरदवाडी शिवारात वास्तव्यास आहे. सिन्नर बायपासवरही त्याचे अनेकदा दर्शन झाले आहे. वस्तीवरील पाळीव श्वान बिबट्याचे भक्ष्य होऊ लागले आहेत.बिबट्याचा गावात शिरण्याचा दुसराही प्रयत्न अपयशीमध्यरात्री १ वाजता पुन्हा बिबट्याने गावात शिरण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रशांत शिरसाट याने बिबट्याला पाहताच जागे असलेल्या ग्रामस्थांना आवाज दिला. सागर शिरसाठ, योगेश रेवगडे, शरद बोंबले, संदीप शिरसाट, कृष्णा बोराडे, अक्षय शिरसाठ, प्रशांत शिरसाट, शरद शिरसाट, अमित शिरसाट, संतोष शिरसाट यांच्यासह ग्रामस्थांनी पुन्हा बिबट्याला हुसकावून लावले. उग्र वासावरून ओळखले बिबट्याचे वास्तव्यमाजी सरपंच बजुनाथ शिरसाठ यांची मुलगी चित्रा रक्षाबंधनासाठी सरदवाडी येथे आली आहे. चिकणी (ता. अकोले) येथे सासरी परिसरात बिबट्यांचे वास्तव्य कायम असल्याने बिबट्याचा उग्र वास तिला लगेच समजून येतो. मंगळवारी रात्री ९ वाजता चित्रा घराबाहेर आली असता बिबट्याचा उग्र दर्प तिने ओळखला. तिने घरात पळत जाऊन बिबट्या जवळपास असल्याची माहिती दिली. सर्वांनी बाहेर येऊन गावातील ग्रामस्थांना आवाज दिला. जमा झालेल्या तरुणांनी बॅटरीच्या उजेडात बिबट्याचा शोध घेणे सुरू केले असता घराजवळच बिबट्याचे दर्शन झाले.परिसरात पिंजरा लावण्याची मागणीमहिनाभरापासून बिबट्याचे कुटुंब परिसरात वास्तव्यास आहे. शेतकऱ्यांना त्याचे दर्शन होत असल्याने शेतकामे करणे अवघड झाले आहे. वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :sinnar-acसिन्नरleopardबिबट्या