शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

ग्राम विद्युत व्यवस्थापक योजना कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 01:48 IST

सायखेडा : खेडेगावात निर्माण होणाऱ्या विजेच्या समस्या तत्काळ सोडविण्यासाठी शासनाने तीन हजार लोकसंख्या असलेल्या गावातील विद्युत क्षेत्रातील आयटीआय केलेल्या बेरोजगार युवकांची निवड करण्यासंदर्भात आॅक्टोबर २०१६ मध्ये काढलेला शासननिर्णय एकदा सरकारी बस्तानात गुंडाळून ठेवला आहे.

सायखेडा : खेडेगावात निर्माण होणाऱ्या विजेच्या समस्या तत्काळ सोडविण्यासाठी शासनाने तीन हजार लोकसंख्या असलेल्या गावातील विद्युत क्षेत्रातील आयटीआय केलेल्या बेरोजगार युवकांची निवड करण्यासंदर्भात आॅक्टोबर २०१६ मध्ये काढलेला शासननिर्णय एकदा सरकारी बस्तानात गुंडाळून ठेवला आहे.राज्यात तीन हजार लोकसंख्या असलेली २३,६७१ गावे असून, या गावात विजेच्या अनेक समस्या निर्माण होत असतात. परिसरातील चार-पाच गावे मिळून एक वायरमनची नियुक्ती केलेली असते. अनेक गावे देखरेखीखाली असल्याने वायरमन अनेकवेळा तत्काळ उपलब्ध होत नाही. शिवाय खेड्यात शेतिपंप, शेतात वास्तव्याला असणारे शेतकरी यामुळे विजेचे जाळे पसरलेले आहे. कामे अनेक असल्याने वायरमन जाऊ शकत नाही. अशावेळी लोक खासगी व्यक्तींकडून कामे करून घेतात. मात्र त्यास जबाबदारी नसल्याने कामाचे स्वरूप बदलते किरकोळ कामासाठी नागरिकांना मोठी रक्कम मोजावी लागते. शिवाय काही दुर्घटना घडली तर वीज वितरण कंपनी जबाबदार नसते. त्यामुळे गावातील डीपीवरील फ्यूज बदलणे, डीओ टाकणे, मीटर बदलणे, तारा तुटल्यास त्या जोडणे, वीजबिल वाटप करणे, वीजबिल वसूल करणे यासारखी कामे करण्यासाठी गावातील योग्य शिक्षण झालेल्या उमेदवारांची मौखिक आणि प्रात्यक्षिक परीक्षा घेऊन मदतनीस म्हणून निवड करावी, असे पत्र वीज मंत्रालयाने आॅक्टोबर २०१६ मध्ये काढले होते.या आधारावर अनेक ग्रामपंचायतींनी गावातीलच बेरोजगार युवकांची निवड केली होती. काही महिने कामदेखील केले. मात्र त्यानंतर कोणत्याही शासकीय यंत्रनेने पुढील अंमलबजावणी केली नसल्याने ग्राम विद्युत व्यवस्थापकाची योजना अखेर शासनाने लाल फितीत गुंडाळून ठेवली आहे. यामुळे ग्रामीण भागातील विजेच्या समस्या कायम आहेत.

टॅग्स :electricityवीज