शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कोरोना नियंत्रणासाठी गावपातळीवर समित्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:13 IST

थकबाकी वसुलीला कोरोनाचा अडसर नाशिक :राज्य वीज वितरण कंपनीने वसुली मोहीम राबविली असली तरी अद्याप अनेक ग्राहकांकडे मोठ्या प्रमाणात ...

थकबाकी वसुलीला कोरोनाचा अडसर

नाशिक :राज्य वीज वितरण कंपनीने वसुली मोहीम राबविली असली तरी अद्याप अनेक ग्राहकांकडे मोठ्या प्रमाणात वीज बिलाची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी वीज कंपनीकडून प्रयत्न केले जात असले तरी कोरोनाच्या संकटामुळे विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.

इतर आजारांच्या रुग्णांचीही गैरसोय

नाशिक : कोरोनामुळे इतर आजारांच्या रुग्णांचीही स्थिती गंभीर झाल्यास बेड मिळणे अवघड झाले आहे. अनेक रुग्णालयांनी कोविड वॉर्ड सुरु केलेले असल्यामुळे इतर आजारांच्या रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्याने घरीच उपचार घ्यावे लागत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

भाजी विक्रेत्यांच्या संख्येवर परिणाम

नाशिक : लॉकडाऊनमुळे शहरातील फिरत्या भाजी विक्रेत्यांची संख्या खूपच कमी झाली असल्याचे दिसते. यामुळे अनेक परिसरातील महिलांना सकाळी या विक्रेत्यांची वाट पहावी लागते. किरकोळ विक्रेत्यांना बाजार समितीतून माल मिळणेही कठीण झाले आहे.

काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध कारवाई

नाशिक : कोरोनावरील औषधांचा होणारा काळाबाजार रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागाने कार्यवाही सुरु केली असून औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येत आहे. या कारवाईमुळे काळाबाजार करणाऱ्यांना चाप बसेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

अंगणवाडी सेविकांना सुविधा देण्याची मागणी

नाशिक : कोरोना काळात जीव धोक्यात घालून सर्वेक्षणाचे काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना सोयी सुविधा पुरविण्याची मागणी केली जात आहे. अनेक अंगणवाडी सेविकांना मास्क, सॅनिटायझर आदी वस्तूंची कमतरता भासते. यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. सध्या अंगणवाडी सेविकांमार्फत कोविड सर्वेक्षणाची कामे सुरु आहेत.

उघड्यावर राहणाऱ्यांचे लसीकरण करा

नाशिक : शहरातील विविध भागात उघड्यावर राहणाऱ्या गोरगरिबांचे लसीकरण करण्यात यावे अशी मागणी केली जात आहे. अनेक सिग्नलच्या चौकांमध्ये हे नागरिक लहान मुलांसह राहतात. दिवसभर तेथेच भिक मागतात यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

सलग दुसऱ्यावर्षी मंडपवाले अडचणीत

नाशिक : मागील वर्षांपासून विवाह सोहळ्यांवर आलेल्या निर्बंधांमुळे मंडप डेकोरेटर्स चालकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. सलग दुसऱ्यावर्षीही या व्यावसायिकांना व्यवसाय मिळत नसल्याने त्यांच्याकडे कामाला असलेल्या मजुरांना सांभाळायचे कसे असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.

कोरोनामुळे घरच्या घरीच दशक्रिया विधी

नाशिक : कोरोनामुळे रामकुंडावर जाऊन दशक्रिया विधी करणाऱ्यांची संख्या घटली आहे. दशक्रिया विधीसाठीही उपस्थितीची मर्यादा असल्याने अनेक नागरिक घरच्या घरीच पूजाविधी करून दशक्रिया विधी करत असल्याने रामकुंडावर होणारी गर्दीही कमी झाली आहे.

कोरोनाचा त्र्यंबकेश्वरच्या अर्थकारणावर परिणाम

नाशिक : त्र्यंबकेश्वर येथे विविध धार्मिक विधींसाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांची संख्या एकदमच कमी झाल्याने येथील अर्थकारणावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. अनेक छोट्या मोठ्या व्यावसायिकांचे व्यवसाय बंद झाले आहेत. यामुळे त्यांच्यासमोर आर्थिक समस्या निर्माण झाल्या आहेत.

पर्यटन स्थळ परिसरातील व्यवसाय बंद

नाशिक : शहर परिसरातील निसर्गरम्य ठिकाणी येणारे पर्यटक बंद झाल्याने या परिसरातील सर्व व्यवसाय बंद पडले असून अनेकांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊनमुळे शहराकडे कुणीही फिरकत नसल्याने या परिसरातील हॉटेल व्यावसायिक त्याचबरोबर इतर पूरक व्यावसायिकांचे व्यवसाय बंद झाले आहेत.