शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

ओझर नगर परिषद होईपर्यंत ग्रामपालिकेची निवडणूक घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 00:53 IST

ओझर : येथील ग्रामपालिकेचे नगर परिषदेत रूपांतर होणार अशी उद्घोषणा शासनाने ४ डिसेंबर रोजी केल्याने पुढील प्रक्रियेला लागणारा वेळ लक्षात घेता तूर्तास ग्रामपालिकेची निवडणूक प्रक्रिया राबवावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, नगरविकास विभागाने नगर परिषद अंमलात येणार असल्याचे न्यायालयासमोर स्पष्ट केल्याने तोदेखील मार्ग मोकळा झाला आहे.

ठळक मुद्देमुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

ओझर : येथील ग्रामपालिकेचे नगर परिषदेत रूपांतर होणार अशी उद्घोषणा शासनाने ४ डिसेंबर रोजी केल्याने पुढील प्रक्रियेला लागणारा वेळ लक्षात घेता तूर्तास ग्रामपालिकेची निवडणूक प्रक्रिया राबवावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, नगरविकास विभागाने नगर परिषद अंमलात येणार असल्याचे न्यायालयासमोर स्पष्ट केल्याने तोदेखील मार्ग मोकळा झाला आहे.राज्यातील १३ ग्रामपालिकांचे नगरपंचायत अथवा नगर परिषदेमध्ये रूपांतर करण्याचे शासनाने जाहीर केले होते; परंतु निवडणूक आयोगाने यावर्षीच्या एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपुष्टात आलेल्या १४,२३४ ग्रामपालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यामुळे ओझरसह राज्यातील इतर गावांतील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर रूपांतरित ग्रामपालिकांच्या निवडणुका न घेता थेट नगर परिषदांच्याच निवडणुका घ्याव्यात, अशी याचिका माजी आमदार अनिल कदम यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर मंगळवारी सुनावणी झाली. न्यायालयाने नगरविकास विभागाचे म्हणणे मागवले असता त्यात ओझरची प्रक्रिया आधीच झाल्याने त्या प्रक्रियेला किमान दोन महिने लागतील, तर अन्य १२ गावांच्या प्रक्रियेला चार महिने लागतील असे सांगण्यात आले; परंतु आधीच कार्यकाळ संपल्याने आणि निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था असल्याने त्यांचे म्हणणे न्यायालयाने ऐकून घेतल्यावर तूर्तास जाहीर झालेल्या निवडणुका घ्याव्यात व ज्यावेळी नगर परिषद अस्तित्वास येईल तेव्हा त्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे ओझर ग्रामपालिकेची निवडणूक घेण्याचे स्पष्ट झाले आहे.राज्य शासनाने नगर परिषदेचे राजपत्र काढलेले असल्याने ती प्रक्रिया सुरूच राहणार आहे. सध्या ग्रामपालिकेची निवडणूक होत असली तरी नगर परिषद अंमलात येणारच आहे. या निवडणुकीवर होणारा दुप्पट खर्च पाहता ती दोन महिने पुढे ढकलण्यात यावी, यासाठी याचिका दाखल केली होती; परंतु आता दोन्ही निवडणुका होतील इतकेच.- अनिल कदम, माजी आमदार, निफाड

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक