शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

ग्रामस्वच्छता अभियान : माळेगाव, अवनखेड, दरी ग्रामपंचायतींना पुरस्कारांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 00:51 IST

स्वच्छता अभियान लोेकचळवळ व्हावी : महाजन लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : जलयुक्त अभियान ही लोकचळवळ झाल्याने हे अभियान यशस्वी झाले. त्याचप्रमाणे स्वच्छ भारत अभियान ही लोकचळवळ झाल्यास हे अभियान यशस्वी होईल. त्यासाठी सर्वांनी स्वत:पासून स्वच्छतेची सुरुवात करावी, असे आवाहन राज्याचे उच्च वैद्यकीय शिक्षण तथा जलसंपदामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले.

ठळक मुद्दे नाशिक : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्काराचे वितरणस्वच्छता अभियान लोेकचळवळ व्हावी : महाजन

प्रथम पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायत माळेगावला पुरस्कार वितरण करताना पालकमंत्री गिरीश महाजन. समवेत पदाधिकारी.

स्वच्छता अभियान लोेकचळवळ व्हावी : महाजन

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जलयुक्त अभियान ही लोकचळवळ झाल्याने हे अभियान यशस्वी झाले. त्याचप्रमाणे स्वच्छ भारत अभियान ही लोकचळवळ झाल्यास हे अभियान यशस्वी होईल. त्यासाठी सर्वांनी स्वत:पासून स्वच्छतेची सुरुवात करावी, असे आवाहन राज्याचे उच्च वैद्यकीय शिक्षण तथा जलसंपदामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले.दादासाहेब गायकवाड सभागृहात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्काराचे वितरण गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल उदय सांगळे होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अनिल कदम, आ. बाळासाहेब सानप, सभापती यतिन पगार, सुनीता चारोस्कर, मनीषा पवार, महापौर रंजना भानसी, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन्, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, जगाच्या पाठीवर कोठेही नसले तरी भारतात उघड्यावर शौचालयास बसण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या दिवसापासूनच स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली. शंभर टक्के हगणदारीमुक्त गावे झाली म्हणजे स्वच्छ भारत अभियान पूर्ण झाले, असे समजण्याचे कारण नाही. कारण जोपर्यंत घर, गावे संपूर्ण परिसर स्वच्छ होत नाही, स्वच्छ पाणी व जेवण मिळत नाही, सृदृढ आरोग्य नागरिकांना मिळत नाही, तोेपर्यंत स्वच्छ भारत अभियान यशस्वी होणार नाही. जलयुक्त शिवार अभियान ही लोकचळवळ झाल्यानेच यशस्वी झाले. त्याचप्रमाणे स्वच्छ भारत अभियान ही लोकचळवळ व्हावी, त्यासाठी सर्वांनी स्वत:पासून सुरुवात करावी, असे आवाहन गिरीश महाजन यांनी केले. आमदार अनिल कदम यांनी सांगितले की, संपूर्ण स्वच्छता अभियानात सर्वांनी स्वत:पासून सुरुवात केल्याशिवाय अभियान यशस्वी होणार नाही. त्यासाठी पुरस्कारप्राप्त व पुरस्काराच्या स्पर्धेत असलेल्या सर्व ग्रामपंचायतींनी यासाठी मेहनत घेणे आवश्यक आहे. अध्यक्ष शीतल सांगळे यांनी जीवनमान उंचावण्यासाठी स्वच्छता अभियानाची आवश्यकता आहे. देश सर्व क्षेत्रात अग्रेसर आहे. मात्र स्वच्छतेच्या बाबतीत काहीसा पिछाडीवर असल्याने महासत्ता होण्यासाठी सर्वांनी स्वच्छतेचा वसा घेतला पाहिजे, असे आवाहन केले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील यांनी उपस्थिताना नवभारत निर्मितीची शपथ दिली.