शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विल्होळीजवळ होणार ‘मिग विमान दर्शन’

By admin | Updated: June 19, 2017 01:21 IST

महापालिकेची मागणी फळाला : मिग विमानांची प्रतिकृती; एचएएल करणार लाखोंचा खर्च

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहरात वाहतूक बेट म्हणून जिल्ह्याची ओळख असलेल्या मीग विमानाची प्रतिकृती मिळावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या महापालिकेची मागणी तब्बल पंधरा वर्षांनंतर मान्य झाली असून, विल्होळी येथे दोन मिग विमानांच्या प्रतिकृती बसविण्यासाठी एचएएल राजी झाली आहे. संरक्षण खात्याने मान्यता दिल्याने ही तयारी एचएएल व्यवस्थापनाने केली आहे. ओझर येथील हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या कारखान्यात आता सुखोईचे काम चालत असले तरी सुरुवातीला मीग विमानांचा कारखाना म्हणूनच ओळख होती. हिमालयाच्या मदतीसाठी सह्याद्री धावण्याच्या घटनेचे ऐतिहासिक स्मरण त्याच्याशी जोडले गेले आहे. यशवंतराव चव्हाण यांना नाशिककरांनी बिनविरोध दिल्यानंतर नाशिककरांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी मीग कारखाना भेट म्हणून दिला. त्यामुळे नाशिकचे नाव औद्योगिक क्षेत्रात देशभरात पोहोचले गेले आणि नाशिकला नवी ओळख मिळाली. त्यामुळे नाशिकमध्ये एखाद्या ठिकाणी खऱ्या मिग विमानाची प्रतिकृती (सांगाडा) मिळावी यासाठी शोभाताई बच्छाव महापौर असताना त्यांनी प्रयत्न केले होते. विल्होळी येथे शहराच्या प्रवेशाच्या ठिकाणी सुमारे एक एकर जागा असून, तेथे हिरवळ लावून सुशोभित करण्यात येणार आहे. दोन मिग विमानांची प्रतिकृती बसवण्यात आल्यानंतर या सर्वच भूखंडाच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च करण्यासाठी एचएएल व्यवस्थापन तयार असल्याचे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले. एचएएलने कराराचा मसुदा तयार केला असून, लवकरच मनपा व व्यवस्थापनात करण्यात येणार आहे.