शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

विल्होळी ग्रामसभेत भंगार बाजाराचा प्रश्न गाजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 00:40 IST

विल्होळी ग्रामपंचायतीच्या हद्दीत हळूहळू पाय रोवू पाहणाऱ्या भंगार बाजारामुळे नागरिकांच्या आरोग्याचा तसेच पर्यावरणाचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून भंगार बाजारातील दुकानांना तत्काळ नोटिसा देऊन त्या हटविण्याचे तसेच यापुढे भंगार दुकानदारांना ग्रामपंचायतीने परवानगी देऊ नये, असा ठराव एकमताने करण्यात आला.

विल्होळी : विल्होळी ग्रामपंचायतीच्या हद्दीत हळूहळू पाय रोवू पाहणाऱ्या भंगार बाजारामुळे नागरिकांच्या आरोग्याचा तसेच पर्यावरणाचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून भंगार बाजारातील दुकानांना तत्काळ नोटिसा देऊन त्या हटविण्याचे तसेच यापुढे भंगार दुकानदारांना ग्रामपंचायतीने परवानगी देऊ नये, असा ठराव एकमताने करण्यात आला.  विल्होळी येथे १५ आॅगस्टचे औचित्य साधून ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच बाजीराव गायकवाड यांची निवड करण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेेत गावातील नळांना पाणीमीटर बसविणे, गाव या हद्दीतील भंगार दुकानदारांना ग्रामपंचायतीने परवानगी देऊ नये तसेच यापुढे ना हरकत दाखले देऊ नये. सध्या असलेल्या दुकानांना त्वरित खाली करण्यास लावणे, या विषयावर चर्चा करण्यात आली. तसेच ग्रामस्थांना प्लॅस्टिक वापरावर सविस्तर माहिती देण्यात आली, कोणत्या प्रकारचे प्लॅस्टिक वापरता य ेईल आणि कोणते वापरता येणार नाही याबाबत शासनाच्या राजपत्राचे वाचन करून नागरिकांना प्लॅस्टिक न वापरण्याचे आवाहन करण्यात आले. मराठा समाजाला तत्काळ आरक्षण लागू करण्याचा ठरावही एकमताने मंजूर करण्यात आला.या ग्रामसभेत शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. रोजगार हमी योजना कृती आराखड्यास मंजुरी देण्यात आली. तसेच तंटामुक्ती अभियान समिती स्थापन करण्यात आली. अपंग कल्याण, महिला बालकल्याण, समाज कल्याण अंतर्गत घ्यावयाच्या योजनांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी ग्रामसेवक बळीराम पगार, तलाठी दत्तात्रेय चोळके, कृषी सहायक पी. बी. पाटील, उपसरपंच श्रीकृष्ण मते यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, वैद्यकीय सेविका, शिक्षक, सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत