शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विलास बिरारी यांना अटक; ७ फेब्रुवारीपर्यंत कोठडी ओझर पार्टी : पोलिसांनी बिरारी यांना प्रमुख सूत्रधार ठरविले

By admin | Updated: February 6, 2015 01:31 IST

विलास बिरारी यांना अटक; ७ फेब्रुवारीपर्यंत कोठडी ओझर पार्टी : पोलिसांनी बिरारी यांना प्रमुख सूत्रधार ठरविले

नाशिक : ओझर येथील नाशिक विमानतळावरील सेवानिवृत्तीची साग्रसंगीत पार्टी आयोजित करणे विमानतळाचा ठेका घेणारे हर्ष कन्स्ट्रक्शनचे संचालक व बिल्डर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष विलास बिरारी यांच्या चांगलेच अंगलट आले असून, काल (दि.५) ते स्वत:च दिंडोरी तालुका पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यांना पोलिसांनी अटक करून न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवस ७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. विशेष म्हणजे पोलिसांनी विलास बिरारी यांना या प्रकरणातील प्रमुख सूत्रधार ठरविले असून, आधी दाखल केलेल्या गुन्'ात आणखी एक कलम वाढविले आहे. याआधी आॅर्केस्ट्रा संचालक सुनील ढगे यांना पोलिसांनी अटक करून न्यायालयापुढे हजर केले. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. काल (दि.५) याप्रकरणी ओझर येथील पार्टीचे आयोजन करणारे हर्ष कन्स्ट्रक्शनचे संचालक विलास बिरारी दिंडोरी पोलिसांना शरण आले. त्यानंतर विलास बिरारी यांना अटक करून दिंडोरी तालुका पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. स्वाती कबनूरकर यांनी युक्तिवाद मांडताना विलास बिरारी यांना चार दिवस पोलीस कोठडीची मागणी केली. सदर प्रकार गंभीर असून, विना जामीनपात्र असल्याचे तसेच या घटनेतील विलास बिरारी हे प्रमुख सूत्रधार असून, संवेदनशील क्षेत्रात वाद्य वाजवून तसेच सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केले आहे. या घटनेत वापरलेल्या वस्तु व साहित्य जप्त करण्यासाठी तसेच या प्रकरणी सहभागी झालेले अन्य जणांचा शोध घेण्यासाठी चार दिवस पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी शाहीन गडकरी यांनी विलास बिरारी यांना तीन दिवस ७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी)