शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

विजयनगरला डेंग्यूसदृश रुग्णसंख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:29 IST

गेल्या काही महिन्यांत विजयनगर परिसरात डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. परिसरातील अस्वच्छता आणि पाण्याच्या डबक्यांमुळे परिसरात डासांची उत्पत्ती वाढली असून, यामुळे रुग्णांचे प्रमाण वाढले असल्याचे बोलले जात आहे.

भगूर : गेल्या काही महिन्यांत विजयनगर परिसरात डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. परिसरातील अस्वच्छता आणि पाण्याच्या डबक्यांमुळे परिसरात डासांची उत्पत्ती वाढली असून, यामुळे रुग्णांचे प्रमाण वाढले असल्याचे बोलले जात आहे. विशेषत: विजयनगर परिसरात अशा प्रकारच्या रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने संपूर्ण परिसरात स्वच्छता करण्याबरोबरच रुग्णांची विशेष तपासणी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.  कॅम्प परिसरातील कॉलनी परिसरात अर्धवट स्थितीत असलेले बांधकाम तसेच मोकळे भूखंड येथे पाण्याचे डबके साचलेले आहे. अर्धवट स्थितीत बांधकाम असल्याने याठिकाणी असलेल्या उघड्यावरील पाण्याच्या टाक्या आणि डबक्यांमुळे डासांचे प्रमाण वाढलेले आहे. मोकळ्या भूखंडावर वाढलेले गवत आणि स्वच्छतेचा अभाव असल्यामुळे आजारात वाढ झाली आहे. दीड महिन्यापूर्वीच कॉलनी परिसरातील एका मुलीला डेंग्यूची लागण झाली होती. त्यानंतर डेंग्यूचे अनेक रुग्ण आढळले होते. त्यावेळी परिसरातील स्वच्छतेची मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात आली होती.  परिसरातील अनेक लोक आजारी असून, अनेकांना खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करावे लागले आहे. नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात देखील अनेकांवर उपचार सुरू आहेत. अर्धवट स्थितीतील बांधकामाकडे झालेले दुर्लक्ष, छावणी परिषदेने स्वच्छतेचा ठेका दिलेला आहे; मात्र त्यांच्यावर कुणाचाही अंकुश नसल्याने पुरेशी स्वच्छता नसल्याची देखील नागरिकांची तक्रार आहे.आरोप-प्रत्यारोपकॅन्टोन्मेंटच्या हद्दीत असलेल्या विजयनगरसह आजूबाजूच्या परिसरात डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळत असताना छावणी परिषदेतील आजी-माजी उपाध्यक्ष आणि सदस्य एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. आरोग्याच्या मुद्द्यावर बोलण्यापेक्षा भ्रष्टाचार आणि नोकरभरती आणि इतर अन्य विषयांवर बोलण्याच्या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याविषयी त्यांना कळकळ नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे. प्रशासकीय कामकाज आणि प्रशासन चालविणे या दोन्ही आघाड्यांवर संबंधितांनी कामकाज केले तर आरोग्याचा प्रश्न सुटू शकेल, अशी भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.