शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

ओझर मर्चंट बँकेच्या चेअरमनपदी विजय शिंदे बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 02:34 IST

ओझर : येथील ओझर मर्चण्ट‌्स बँकेच्या चेअरमनपदी विजय भिकाजी शिंदे, व्हाइस चेअरमनपदी अरुण विष्णुपंत पवार, तर जनसंपर्क संचालक म्हणून विकास भट्टड यांची निवड करण्यात आली.

ठळक मुद्देव्हाइस चेअरमनपदी अरुण पवार; जनसंपर्क संचालकपदी विकास भट्टड

ओझर : येथील ओझर मर्चण्ट‌्स बँकेच्या चेअरमनपदी विजय भिकाजी शिंदे, व्हाइस चेअरमनपदी अरुण विष्णुपंत पवार, तर जनसंपर्क संचालक म्हणून विकास भट्टड यांची निवड करण्यात आली.

मावळते चेअरमन रवींद्र भट्टड तसेच संदीप अक्कर व प्रशांत चौरे यांनी रोटेशननुसार राजीनामा दिल्याने बँकेच्या भिकाजी भाऊराव शिंदे सभागृहात तालुका सहनिबंधक अभिजित देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडप्रक्रियेत विजय शिंदे व अरुण पवार यांना अनुक्रमे सूचक म्हणून रवींद्र भट्टड व संदीप अक्कर यांनी तर रत्नाकर कदम व राजेंद्र शिंदे यांनी अनुमोदन दिले. दोघांचे एक एक अर्ज आल्याने देशपांडेंनी सदर निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर भालचंद्र कासार यांनी विकास भट्टड यांच्या नावाची जनसंपर्क संचालक म्हणून घोषणा केली. नवीन पदाधिकाऱ्यांची निवड होताच फटाके फोडून स्वागत करण्यात आले. निवडीनंतर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. नितीन ठाकरे, मोहन पिंगळे, भास्कर शिंदे, भालचंद्र कासार, मेडिकल असोसिएशन व प्रशासनाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वैद्य व कर्मचाऱ्यांनी सत्कार केला. यावेळी संचालक नवनाथ मंडलिक, भालचंद्र कासार, रत्नाकर कदम, वसंत गवळी, भारत पगार, शरद सिन्नरकर, रउफ पटेल, लक्ष्मण सोनवणे, ज्ञानेश्वर आहेर, प्रशांत मोरे, प्रशांत चौरे, भारत पल्हाळ, जिजाबाई रास्कर, संजय सोनवणे, बाळासाहेब जाधव, मेघा पाटील आदी उपस्थित होते.आज निफाडची मुख्य अर्थवाहिनी म्हणून ओमकोची ख्याती आहे. संस्थापकांनी घालून दिलेल्या आदर्शावर वाटचाल करू. एनपीए शून्यावर कसा आणता येईल त्यासाठी प्रयत्न करणार आहे. आम्ही सर्व संचालक मिळून बँकेच्या प्रगतीचा आलेख असाच कायम ठेवणार आहोत.- विजय शिंदे, चेअरमन, ओझर मर्चण्ट बँक. 

टॅग्स :bankबँकElectionनिवडणूक