शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

विजय जानोरकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:16 IST

नाशिक : फाळके फिल्म सोसायटीचे अध्यक्ष तसेच साप्ताहिक रसरंगचे संपादक विजय जानोरकर (७७) यांचे रविवारी राजीवनगरमधील त्यांच्या निवासस्थानी अल्पशा ...

नाशिक : फाळके फिल्म सोसायटीचे अध्यक्ष तसेच साप्ताहिक रसरंगचे संपादक विजय जानोरकर (७७) यांचे रविवारी राजीवनगरमधील त्यांच्या निवासस्थानी अल्पशा आजाराने निधन झाले.

नाशिकमध्ये १९६३ साली त्यांनी पत्रकारितेचा प्रारंभ केला होता. प्रख्यात समीक्षक इसाक मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली जानोरकर यांनी चंदेरी दुनियेच्या पत्रकारितेला प्रारंभ केला. तसेच रसरंगचे संपादकपद त्यांनी प्रदीर्घ काळ भूषविले. रसरंगच्या माध्यमातून चित्रपट दुनियेतील पत्रकारितेची अनोखी मुशाफिरी घडविल्याने त्यांना राज्यभरात वाचकवर्ग लाभला होता. अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये जाऊन त्यांचे परीक्षण करण्याचे कार्यदेखील त्यांनी प्रदीर्घ काळ केले. हिंदी, मराठी चित्रपटांच्या मुंबईतील विशेष प्रीमिअरला त्यांना खास निमंत्रण देऊन त्यांच्याकडून अनेक दिग्दर्शक, निर्माते चित्रपटाबाबत मत विचारत, इतका या क्षेत्रात त्यांचा दबदबा होता. नाट्य-चित्रपटाचे परीक्षण ही संकल्पना ज्यावेळी प्रचलित नव्हती, त्या काळात त्यांनी लिहिलेली रसपूर्ण परीक्षणे खूपच वाचकप्रिय ठरली होती. तसेच १९७९ साली त्यांनी काही अन्य मान्यवरांसह फाळके फिल्म सोसायटीची स्थापना केली होती. त्या माध्यमातून फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीव्दारे विविध देशांमधील अनेक कलात्मक चित्रपटांच्या शोचे त्यांनी नाशिकच्या रसिकांसाठी प्रदर्शन केले. रसिक प्रेक्षकांबरोबरच बालकांसाठीदेखील अनेक दर्जेदार आणि विनोदी चित्रपटांचे खुले प्रदर्शन करून बालकांच्या जाणिवा समृद्ध करण्यातही योगदान दिले. त्यांच्या पार्थिवावर नाशिक अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

फोटो

०८जानोरकर