शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

वीज कंत्राटी कामगारांचे कामबंद आंदोलन सुरू

By admin | Updated: May 30, 2017 00:44 IST

महावितरण कंपनीतील कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत कामबंद आंदोलनाला वीज कामगारांनी पाठिंबा देत काळ्या फिती लावून काम केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : वीज उद्योगातील महानिर्मिती, महापारेषण व महावितरण कंपनीतील कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी नवव्या दिवशी बेमुदत कामबंद आंदोलनाला वीज कामगारांनी पाठिंबा देत काळ्या फिती लावून काम केले. तीनही वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांच्या कंत्राटी-बाह्यस्त्रोत कामगारांना ज्येष्ठतेप्रमाणे कायम करा, रानडे समितीच्या अहवालानुसार कंत्राटी कामगारांना कायम करावे, कंत्राटी कामगारांना कायम होईपर्यंत पूर्वाश्रमीच्या विद्युत कंपनीतील रोजंदारी कामगार पद्धतीनुसार कामावर घ्यावे व शाश्वत रोजगाराची हमी द्यावी, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या समान काम समान वेतनाच्या निर्णयानुसार कामगारांना समान काम समान वेतन मागील फरकासह मिळावे, कामगारांची ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात यावी, कामावरून कमी केलेल्या कंत्राटी कामगारांना विनाविलंब कामावर घेण्यात यावे आदि मागण्यांसाठी कंत्राटी कामगारांचे कामबंद धरणे आंदोलन चालू आहे. विद्युत भवन येथे सोमवारी दुपारी झालेल्या द्वारसभेत वीज कंपनीतील कामगारांनीदेखील कंत्राटी कामगारांच्या आंदोलनात पाठिंबा देत काळ्या फिती लावून काम केले. धरणे आंदोलनात व्ही. डी. धनवटे, डी. आर. दाते, प्रकाश जाधव, अरुण म्हस्के, डी. एस. जाधव, बापू कुमावत, गुलाब आहेर, ललित वाघ, दीपक गांगुर्डे, सुभाष काकड, पंडित कुमावत आदि सहभागी झाले आहेत.