शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
2
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
3
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
4
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
5
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
6
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
8
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
9
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश
10
ऑलिम्पिक क्रिकेटसाठी केवळ ६ संघांना संधी, कशी ठरणार पात्रता, कोण घेणार निर्णय? नीट समजून घ्या
11
शाळा सोडली, स्वप्न थांबली, पण हार नाही मानली; आव्हानांना तोंड देत पार पाडतेय कर्तव्य
12
धक्कादायक! 'पंचायत' फेम आसिफ खानला हृदयविकाराचा झटका, म्हणाला- "एका क्षणात सगळं बदललं..."
13
एक कोटी रुपये कमाई, तरीही तो दु:खी, सोशल मीडियावर मांडली व्यथा, म्हणाला, पैसा आहे पण...   
14
५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत! आयुष्मान कार्ड अंतर्गत नेमके कोणते आजार येतात? लगेच तपासा!
15
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
16
Astro Tips: सगळं काही चांगलं आहे, तरी लग्न होत नाही; याला कारणीभूत ठरू शकते ग्रहदशा!
17
Olympics 2028: ऑलिंम्पिकचं वेळापत्रक जाहीर! कधी, कुठं रंगणार क्रिकेट सामने? A टू Z माहिती
18
फक्त २० रुपयांमध्ये २ लाखांचा विमा! मोदी सरकारची 'ही' योजना संकटात बनेल आधार! कसा करायचा अर्ज?
19
"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते
20
"खाण्यासाठीच कमावतोय..."; मॅनेजरने लंच ब्रेक घेण्यापासून रोखलं, कर्मचाऱ्याने सडेतोड उत्तर दिलं

याद्यांमधील गोंधळास मतदारच जबाबदार

By admin | Updated: February 22, 2017 22:50 IST

प्रशासनाचा पवित्रा : मतदारांवरच फोडले खापर

नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी मतदार याद्यांमध्ये झालेल्या गोंधळाची जबाबदारी घेण्यास मनपा प्रशासन तयार नाही, याउलट या गोंधळाला मतदारच जबाबदार असून, प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यात योग्य त्या सुधारणा- दुरुस्त्या करून घेण्याची जबाबदारी मतदारांची होती, असा पवित्रा मनपा प्रशासनाने घेतला आहे.  महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.२१) मतदान घेण्यात आले. यंदा मतांचा टक्का वाढून मतदान विक्रमी ६२ टक्के नोंदविले गेले असले तरी जवळपास सर्वच प्रभागांमध्ये मतदार याद्यांमधील गोंधळाचा फटका शेकडो मतदारांना बसल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले. असंख्य मतदारांना त्यांची नावे मतदार यादीत शोधूनही सापडली नाहीत, तर शेकडो मतदारांचे वास्तव्य एका प्रभागात तर मतदान दुसऱ्या प्रभागात, अशी स्थिती निदर्शनास आली. एकाच कुटुंबातील सदस्यांना वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर मतदान करावे लागले, तर अनेकांना नेहमीच्या मतदान केंद्रांऐवजी दूर अंतरावर पायपीट करत मतदानासाठी जावे लागले. मतदार यादीत नावे गायब झाल्याने पंचवटीतील म्हसरूळ याठिकाणी मतदारांकडून रास्ता रोकोचा प्रयत्न झाला, तर नाशिकरोड विभागातही मतदार यादीवरून गोंधळ उडाला. या साऱ्या गोंधळाबाबत महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी अभिषेक कृष्ण यांनी मात्र, मतदारांनाच जबाबदार धरले आहे. ज्या मतदारांची तक्रार आहे त्यांनी तशी लेखी तक्रार करावी. (प्रतिनिधी)नाशिकरोडला पायरेटेड सीडीनाशिकरोडला मतदार यादीबाबत झालेल्या गोंधळाचे कारण निराळे होते. मतदार यादीत सुधारणा व दुरुस्त्यांचे काम सुरू असतानाच संबंधितांनी कुठून तरी मतदार यादी असलेली सीडी मिळविली आणि त्याच्या पायरेटेड कॉपी प्रभागात वाटल्या. त्यामुळे त्यात त्रुटी दिसून येणारच. महापालिकेने अंतिम मतदार यादी घोषित केल्यानंतर त्याच्या सीडी उपलब्ध करून दिल्या होत्या, असेही आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी स्पष्ट केले.वास्तविक प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केल्यानंतर त्यावर रीतसर हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्याचवेळी मतदारांनी आपले नाव यादीत आहे किंवा नाही, याची खात्री करून घेणे आवश्यक होते.  त्यावेळी प्राप्त ६५० हरकतींवर कार्यवाही करत प्रशासनाने त्या निकालीही काढल्या होत्या. मात्र, स्वत: जागृत न राहता ऐन मतदानाच्या वेळी ओरड करणे उचित नसल्याचेही आयुक्तांनी सांगितले.  उलट मतांचा टक्का वाढावा यासाठी महापालिका प्रशासन सातत्याने प्रयत्न करत आली आहे. त्यातूनच मतदानाची काही प्रमाणात टक्केवारी वाढण्यास मदत झाल्याचा दावाही त्यांनी केला.