शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

ठाणगाव शिवारात बिबट्याचे दर्शन

By admin | Updated: June 4, 2016 22:51 IST

परिसरात घबराट : युवकावर हल्ला

येवला : तालुक्यातील ठाणगाव शिवारात शेतकऱ्यांना शनिवारी दुपारच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन घटनास्थळी फटाके वाजवल्याने बिबट्या सैरावैरा धावत असताना परिसरातील नागरिकांच्या काळजाची धडधड वाढवत होता. घाबरलेल्या बिबट्याने गावातील एका तरु णावर हल्ला केला असून सदर तरु ण किरकोळ जखमी झाला आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी याठिकाणी पिंजरा लावला असून बिबट्याला पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. ठाणगाव शिवारात कॅनॉललगत असलेल्या माधव रखमाजी शेळके यांच्या राहत्या घराच्या पश्चिमेला गुरासाठी ठेवलेल्या गवताच्या खोंडाच्या बाजूला असलेल्या रस्त्याने गावातील युवक चालले होते. त्यांना गवताच्या भाऱ्यात काहीतरी हालचाल होत असल्याचे दिसले. त्यांनी जवळ जाऊन मागोवा घेण्याचा प्रयत्न केला असता त्यामधील एका युवकाला तेथे बिबट्याचे दर्शन झाले. त्याने तातडीने गावातील ग्रामस्थांना एकत्र करून माधव शेळके यांच्या गवताच्या खोंडाजवळ फटाके वाजविले. फटक्यांच्या आवाजाने घाबरलेला बिबट्या गवताच्या भाऱ्यातून बाहेर आला. पण जवळच एक हजार फुटावर असलेल्या दुसऱ्या गवताच्या खोंडात पळाला. यावेळी कृउबा माजी संचालक देवीदास शेळके यांनी तत्काळ वनविभागाला दूरध्वनीद्वारे कळविले. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी येऊन पुन्हा फटक्याची आतषबाजी केल्याने घाबरलेल्या बिबट्याने या मार्गावरून गावाकडे जात असलेल्या संजय शिंदे या युवकावर हल्ला केला. या हल्ल्यात संजय शिंदे यांच्या मानेला व पोटाला किरकोळ जखमा झाल्या असून, त्यांना उपचारासाठी येवला ग्रामीण रु ग्णालयात दाखल केले आहे. (वार्ताहर)