शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषद : शिक्षक मतदारसंघासाठी प्रतापदादा सोनवणे, ठाकरेंची तयारी भाजपात इच्छुकांची मोर्चेबांधणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 01:23 IST

विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघातून उमेदवारीसाठी विविध पक्षांच्या शिक्षक संघटनांमधील इच्छुकांमध्ये स्पर्धा सुरू असताना त्यात आता मूळ पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची भर पडली आहे.

ठळक मुद्देनिवडणूक पुढील वर्षी होणारसंघटनांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणे सुरूभाजपाने पुन्हा संधी नाकारली

नाशिक : विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघातून उमेदवारीसाठी विविध पक्षांच्या शिक्षक संघटनांमधील इच्छुकांमध्ये स्पर्धा सुरू असताना त्यात आता मूळ पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची भर पडली आहे. माजी आमदार आणि खासदार प्रतापदादा सोनवणे तसेच अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी तयारी सुरू केली आहे. तर राष्टÑवादीच्या वतीने संदीप बेडसे हेदेखील दावेदारी करीत आहेत.विधान परिषदेच्या नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पुढील वर्षी होणार आहे. पाच जिल्ह्यांचा हा मतदारसंघ असल्याने उमेदवारी अगोदरच घोषित करणे क्रमप्राप्त ठरते. दरम्यान, या निवडणुकीसाठी शिक्षक भरती, शिक्षक परिषद, टीडीएफ या पक्षांमधील शिक्षक नेते प्रयत्नशील असून, काही संघटनांमध्ये तर उमेदवारी घोषित करण्यावरून रण पेटले आहे. अशा स्थितीत मूळ पक्षातील नेतेही स्पर्धेत उतरले आहेत. यापूर्वी पदवीधर मतदारसंघातून दोनवेळा प्रतिनिधित्व करणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रतापदादा सोनवणे आणि त्याचप्रमाणे मविप्रचे माजी सभापती अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी त्यासाठी कंबर कसली असून, उभयतांनी शिक्षण संस्था चालकांच्या तसेच शिक्षक संघटनांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणे सुरू केले आहे. त्यामुळे राजकीय स्पर्धा तीव्र झाली आहे. प्रतापदादा सोनवणे यांनी विधान परिषदेच्या मतदारसंघातून यश मिळवल्यानंतर धुळे लोकसभा मतदारसंघात यश मिळवून त्याचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांना वयाचे आणि प्रकृतीचे कारण दाखवून भाजपाने पुन्हा संधी नाकारली होती. त्यानंतर त्यांनी तापी खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्षपदही मागितले, परंतु पक्षाने हिरवा कंदील दिला नाही. पदवीधरसाठी ते पुन्हा इच्छुक असताना पक्षाने केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांचे निकटवर्तीय असलेल्या डॉ. प्रशांत पाटील यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातल्यामुळे प्रतापदादा सोनवणे नाराज झाले. त्याचबरोबर अशाच प्रकारे पदवीधरसाठी इच्छुक असलेल्या अ‍ॅड. नितीन ठाकरेयांचीही तीच गत झाली.काही इच्छुकांचा प्रचारराष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने संदीप बेडसे दावेदार असून, त्यांनीदेखील प्रचार सुरू केला आहे. विशेष म्हणजे बेडसे हे राष्टÑवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे एकेकाळी स्वीय सहायक होते. शासकीय सेवेचा राजीनामा देऊन त्यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत धुळे जिल्ह्यातून भवितव्य आजमावले होते. परंतु जयकुमार रावळ यांच्यासमोर त्यांचा टिकाव लागला नाही. मात्र आता शिक्षक मतदारसंघासाठी ते दावेदार करीत आहेत.