शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर व्हिडिओ शूटिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 14:40 IST

Maharashtra Election 2019 कळवण : कळवण- सुरगाणा विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. या विधानसभा मतदारसंघात १४ अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर सूक्ष्म निरीक्षक नेमण्यात आले आहेत.येथे मतदान संपेपर्यंत पूर्णवेळ व्हिडीओ शूटिंग केले जाणार असून अतिरिक्त फौजफाटाही तैनात ठेवण्यात आला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिली.

कळवण : कळवण- सुरगाणा विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. या विधानसभा मतदारसंघात १४ अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर सूक्ष्म निरीक्षक नेमण्यात आले आहेत.येथे मतदान संपेपर्यंत पूर्णवेळ व्हिडीओ शूटिंग केले जाणार असून अतिरिक्त फौजफाटाही तैनात ठेवण्यात आला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिली.कळवण- सुरगाणा विधानसभा मतदारसंघात एकूण ३३८ मतदान केंदे्र आहेत. यामध्ये सुरगाणा तालुक्यातील १४ मतदान केंद्र अतिसंवेदनशील असल्याने निवडणूक आयोगाने या केंद्रावर सूक्ष्म निरीक्षकांची नेमणूक केली आहे. तसेच याशिवाय या ठिकाणी मतदानाच्या दिवशी पूर्णवेळ व्हिडीओ शूटिंग करण्यात येणार आहे. इतर ३४ मतदान केंद्रावर वेबकास्टींगची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून ३६ मतदान केंद्रावर व्हिडीओ ग्राफर नेमण्यात आले आहेत.मतदान करणे सुलभ व्हावे यासाठी १५ आवश्यक सोयी सुविधा पुरविण्यात येणार आहेत. यामध्ये दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प, व्हीलचेअर तसेच स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर एक पोलिस शिपाई, एक होमगार्ड तसेच मतदार संघाकरिता एक सीआरपीएफ कंपनी तैनात करण्यात आली आहे. यामुळे या विधानसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसेल, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक