शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

VIDEO : नाशिकच्या जाईजुईला मिळाले फॉरेनचे आईबाबा

By admin | Updated: May 29, 2017 16:30 IST

आॅनलाइन लोकमत/अझहर शेख   नाशिक, दि. 29 - एकीकडे विवाहनंतरही अनेक वर्ष संतती प्राप्तीसाठी संघर्ष करणारे अनेक जोडपे समाजात ...

आॅनलाइन लोकमत/अझहर शेख  

नाशिक, दि. 29 - एकीकडे विवाहनंतरही अनेक वर्ष संतती प्राप्तीसाठी संघर्ष करणारे अनेक जोडपे समाजात आढळून येतात. नैसर्गिकदृष्ट्या किंवा शारीरिकदृष्टया काही कारणांमुळे त्यांना संततीसुख मिळत नाही तर दुसरीकडे समाजातील काही निष्ठुर मातांनी अनेकदा अर्भक बेवारस स्थितीत वर्दळीच्या ठिकाणी किंवा एखाद्या रुग्णालयाच्या परिसरात सोडून देत पोबारा केल्याच्या विविध घटनांमधून समोर आले आहे.

हा विरोधाभास आजही विविध शहरांमध्ये पाहवयास मिळतो. खरे तर अशा स्त्रीने बाळाला जन्म दिला असला तरी तिला माता म्हणणे योग्य ठरणार नाही कारण तिने नवजात अर्भकाला वाऱ्यावर सोडून मातृत्वाचे महत्त्व तर जाणलेच नाही; मात्र माणुसकीलाही काळीमा फासणारे कृत्य केलेले असते.

अशाच एका महिलेनं गेल्या वर्षी जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात बारा दिवसांचे दोन जुळ्या मुली एका रुग्णालयाबाहेर सोडून पोबारा केला होता. या स्त्रीने जरी पोटच्या मुलींना वाऱ्यावर सोडले असले तरी नियतीने मात्र अवघ्या नऊ महिन्यांतच नाशिकच्या आधाराश्रमात वाढणाऱ्या ‘जाई-जुई’ या जुळ्या बहिणींच्या झोळीत थेट अमेरिकेचे पालकत्व टाकले आहे.

केंद्र सरकारच्या सेंट्रल अ‍ॅडॉप्शन रिसोर्स आॅथॉरिटीमार्फत (कारा) राबविल्या जाणाऱ्या चाइल्ड अ‍ॅडॉप्शन रिसोर्स इन्फॉर्मेशन अ‍ॅण्ड गाइडन्स सिस्टम अर्थात केअरिंग प्रणालीच्या माध्यमातून जाई-जुईला अमेरिकेच्या न्यू-यॉर्क शहरात वास्तव्यास असलेल्या सुशिक्षित हिटगर दाम्पत्याने दत्तक घेतले आहे.

ख्रिस्तोपर डिटगर आणि तारा हिटगर असे या जोडप्याचे नाव आहे. या जोडप्यांना सात वर्षांची एक मुलगी आहे. या मुलीद्वारे संततीसुख मिळाले; मात्र त्यानंतर नैसर्गिक कारणांमुळे पुढे नियतीने त्यांचे संततीसुख हिरावून घेतले. त्यामुळे आपल्या आई-वडिलांच्या सल्ल्याने या दाम्पत्यानं भारतीय वंशाचे मुल दत्तक घेण्याचा निर्णय घेत ‘कारा’मार्फत अर्जाद्वारे इच्छा प्रदर्शित केली होती.

दोन दिवसांपासून नाशिकच्या घारपुरे घाट परिसरातील आधाराश्रमात हे दाम्पत्य मुक्कामी होते. जाई-जुई या दोन्ही बहिणी त्यांच्या अंगाखांद्यावर चांगल्या प्रकारे खेळू लागल्या आणि लवकरच रुळल्याने त्यांनाही आनंद झाला. पेशाने शिक्षक असलेल्या ताराच्या रुपाने त्यांना माता व नोकरी करणारे ख्रिस्तोपर यांच्या रुपात पिता मिळाल्यामुळे या मुलींचे पुढील आयुष्य बदलून जाणार आहे हे नक्की.काय आहे ‘कारा’ची केअरिंग प्रणाली‘कारा’ सरकारच्या सेंट्रल अ‍ॅडॉप्शन रिसोर्स आॅथॉरिटीमार्फत (कारा) काही वर्षांपूर्वी जन्मत: व्यंग किंवा गंभीर अनुवांशिक आजार असलेल्या विशेष काळजीच्या निराधार बालकांना पालकत्व लाभण्यासाठी केअरिंग नावाची प्रणाली सुरू करण्यात आली. या प्रणालीमुळे बालकांना परदेशी दाम्पत्यांच्या रुपाने पालकत्व मिळू लागले. ‘केअरिंग’च्या प्लॅटफॉर्मद्वारे नाशिक शहरातून बारावे मूल परदेशात दत्तक घेतले गेले आहे, अशी माहिती आधाराश्रमातील समन्वयक राहुल जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. जाई-जुई या सिकलसेल आजाराच्या रुग्ण असून या दोन्ही मुलींच्या हृदयालादेखील छिद्र आहे. त्यामुळे या चिमुकली विशेष गरजूंच्या गटात मोडतात.

https://www.dailymotion.com/video/x844zsq