शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

शिवसेना कार्यालयात विजयी मेळावा

By admin | Updated: May 17, 2014 00:19 IST

उद्धव ठाकरे यांची लवकरच विजयी सभा

उद्धव ठाकरे यांची लवकरच विजयी सभा नाशिक : नाशिक लोकसभा निवडणुकीत हेमंत गोडसे यांच्या बाजूने मतदारांनी कौल दिल्यानंतर शालिमार चौकातील शिवसेनेच्या कार्यालयात शिवसैनिकांचा विजयी मेळावा जल्लोषात पार पडला. येत्या दोन-चार दिवसांत शहरात शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची विजयी सभा होणार आहे. महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा विजय निश्चित झाल्यानंतर शालिमार चौकातील शिवसेनेच्या कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी एकच गर्दी केली होती. मात्र विजयी मिरवणुकीला बंदी घालण्यात आल्याने चौकातच फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची मुक्त उधळण करीत शिवसैनिकांनी जल्लोष करून परिसर दणाणून सोडला. शिवसेना कार्यालयाच्या सभागृहात शिवसैनिकांचा विजयी मेळावा घेण्यात आला. यावेळी आमदार बबन घोलप हे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीकेची झोड उठवित म्हणाले, येत्या विधानसभेतही भुजबळांना पराभवालाच सामोरे जावे लागेल. त्यांनी जी पापे केली त्याचा हा परिणाम आहे. देवळालीतून त्यांना मते तर मिळणार नव्हती तर सिन्नरकरांना दुखावलेले होते. त्यांना शिवसेनेने आपलेसे केले. भुजबळ लोकांच्या नजरेतून उतरले होते म्हणूनच त्यांचा पराभव झाला, असेही घोलप म्हणाले. यावेळी शिवसेनेचे महानगरप्रमुख यांनीही भुजबळांवर तोंडसुख घेत शिवसेनेचा विजय हा तमाम शिवसैनिकांचा असून, त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचे हे फळ असल्याचे म्हटले आहे. याप्रसंगी व्यासपीठावर शिवाजी सहाणे, माजी महापौर विनायक पांडे, जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, दत्ता गायकवाड, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष पवन क्षीरसागर आदि उपस्थित होते. मेळाव्यानंतर हेमंत गोडसे यांच्या नावाने जयघोष करण्यात आला.