शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रहाळकर पॅनलचा दणदणीत विजय नाएसो निवडणूक : प्रतिस्पर्धी एनएस पॅनलला अवघी एक जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 01:36 IST

नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या त्रैवार्षिक निवडणुकीत सूर्यकांत रहाळकर पॅनलच्या उमेदवारांनी विजय मिळवला

ठळक मुद्देमतदान प्रक्रियेत ७५ टक्के मतदान रहाळकर यांची बिनविरोध निवड

नाशिक : नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या त्रैवार्षिक निवडणुकीत सूर्यकांत रहाळकर पॅनलच्या उमेदवारांनी विजय मिळवला तर प्रतिस्पर्धी एन.एस. पॅनलला केवळ एका जागेवर विजय मिळविता आला. संस्थेच्या पेठे विद्यालयात झालेल्या या मतदान प्रक्रियेत सुमारे ७५ टक्के मतदान झाले.अध्यक्षपदासाठी सूर्यकांत रहाळकर यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदासाठी दोन, कार्यवाहपदासाठी एक आणि कार्यकारी मंडळासाठी आठ जागांसाठी मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत सुहास अष्टपुत्रे प्रणीत एन.एस. पॅनलमधील कार्यकारी मंडळातील केवळ एकमेव उमेदवार स्नेहमयी भिडे निवडून आल्या.

नाशिक एज्युकेशन सोसायटी ही शिक्षकांनी चालवलेली संस्था असून, संस्थेच्या निवडणुका हा आमच्या दृष्टीने गौण मुद्दा आहे. आता निवडणूक प्रक्रिया संपली असून, सर्वजण पुन्हा एक दिलाने कामाला लागतील. विजयी आणि पराभूत उमेदवारांना एकत्र घेऊनच काम केल्याने संस्थेचा विकास होणार आहे. शिक्षकांचा विश्वास जिंकणे ही आमच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे. - सूर्यकातं रहाळकर, नवनिर्वाचित अध्यक्षनिवडणूकीत काहीशी चुरस निर्माण होणे हे स्वाभाविक असले तरीही आता निवडणूक संपल्यानंतर कटूताही संपली आहे. मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी, शाळेत जाऊन शिक्षकांना भेटणे तसेच फेलोज्ला घरी जाऊन भेटीगाठी घेत आणि यानिमित्ताने संपर्क साधण्याची मिळालेली संधी यामुळे विजयाचा मार्ग सुकर झाला. नव्याने निवडून आलेल्या सदस्यांबरोबर पूर्वी सुरू केलेले प्रकल्प पुन्हा सुरू करणार.- प्रा. दिलीप फडके, नवनिर्वाचित उपाध्यक्ष