शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

विजयी महिलांनी केला ग्रामविकासाचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 01:28 IST

नाशिक : ग्रामविकासाच्या दृष्टिने महत्त्वाचे माध्यम मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीच्या यंदाच्या निवडणूकीत ५० टक्क्याहून अधिक महिला विजयी झाल्याने गावगाडा हाकण्यासाठी पुरुषांच्या बरोबरीने त्यादेखील कारभारी ठरल्या आहेत.

ठळक मुद्देयंदाच्या निवडणूकीत युवा वर्गाचा सहभाग सर्वाधिक

जिल्ह्यात ५६५ ग्रामपंचायतींमध्ये ४२२९ जागांसाठी झालेल्या निवडणूकीत ११ हजार ५६ उमेदवारांनी नशीब आजमावले. यावेळच्या निवडणूकीत युवा वर्गाचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला. विशेष म्हणजे पुरुषांहून अधिक महिला विजयी झाल्याचे दिसून आले. यात २५३७ महिलांनी ग्रामपंचायतीत प्रवेश केला असून ग्रामविकासासाठी योगदान देण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे.ग्रामपंचायत निवडणूकीचा लेखाजोखानिवडणूका झालेल्या ग्रामपंचायती५६५निवडून आलेले उमेदवार४२२९ग्रा.पं. निवडणुकीत विजयी महिला उमेदवार२५३७सिन्नर तालुक्यात महिलांचे वर्चस्वसिन्नर तालुक्यात १०० ग्रामपंचायतींच्या निवडणूका पार पडल्या. यात सर्वाधिक ५६० महिला उमेदवार विजयी झाल्या. या तालुक्यात मुसळगाव ग्रामपंचायतीमध्ये सर्वात जास्त ९ तर मुसळगाव ग्रामपंचायतीत ८ महिला उमेदवार विजयी झाला. पहिल्यांदाच महिला इतक्या मोठ्या संख्येने रिंगणात उतरल्या होत्या.ग्रामपंचायत निवडणूकीचा लेखाजोखाविजयी महिला उमेदवारांच्या प्रतिक्रियागावातील पिण्याचा पाण्याचा तसेच स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावण्यावर भर देणार आहे. तसेच बचतगटाच्या माध्यमातून महिलांना सक्षमीकरण व आर्थिक सशक्तीकरण करण्यासाठी जोड व्यवसाय उभा करुन आर्थिक दुर्बलता दूर करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले आहे.- पुजा आहेर, ग्रामपंचायत, न्यायडोंगरीगाव समस्यामुक्त तसेच सर्वगुणसंपन्न करण्याचे ध्येय मी डोळ्यासमोर ठेवले आहे. मतदारांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करणार आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावास विकास घडवून आणणे हिच माझ्या विजयाची पावती असेल.- ज्योतीताई मोगल, ग्रामपंचायत, लखमापूरकनाशी गावातील श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार करुन तीर्थक्षेत्र विकास निधीतून परिसराचा विकास करणार असून गावात नवीन नळ पाणीपुरवठा योजनासह गावांतर्गत रस्ते विकासाला प्राधान्य देणार, महिला बचत गटांना अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार सांस्कृतिक भवनची निर्मिती करुन मंगल कार्यालयाचे सुशोभिकरण करणार.- वैशाली शिरसाठ, ग्रामपंचायत, कनाशी

टॅग्स :Nashikनाशिकgram panchayatग्राम पंचायत