शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कोयत्याचा धाक दाखवून येवल्याच्या डॉक्टरना लुटले

By admin | Updated: June 15, 2015 23:34 IST

कोयत्याचा धाक दाखवून येवल्याच्या डॉक्टरना लुटले

येवला : पुण्याहून सहकुटुंब परतत असताना येवल्याचे प्रथितयश डॉक्टर सचिन माणिकलाल शर्मा यांना कोपरगावनजीक जुन्या गंगेजवळ कोयता मानेला लावून ७८ हजार रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. कोपरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून, लुटारू नेमके कोण याचा शोध पोलीस घेत आहेत. येवल्याचे डॉ. सचिन शर्मा हे आपली पत्नी व मुलांना घेऊन कारने (एमएच १५ बीएन ९३८१) पुण्याहून येवल्याकडे येत होते. रविवारी रात्री ११ वाजता कोपरगाव येथील जुनी गंगा या ठिकाणी गाडी पंक्चर झाल्याने जॅक लावून गाडीचे चाक बदलत होते. दरम्यान, २० ते २२ वर्षे वयाचे साडेपाच फुट उंचीचे काळ्यासावळ्या रंगाचे दोन युवक बळजबरीने चाक खोलण्यासाठी मदत करू लागले. मदतीपोटी मी त्यांना १०० रुपये देऊ केले. दरम्यान, एकाने कोयता काढून दमबाजी करत पत्नीच्या पर्समध्ये असलेले १३ हजार रु पये, ४० हजार रुपयांची सोन्याची पोत, २५ हजार रुपयांचे दोन मोबाइल असा ऐवज लुटला, असे फिर्यादीत म्हटले आहे. संबंधित लुटारूंचे चेहरे ओळख परेड झाल्यास समजतील, असे डॉ. शर्मा यांचे म्हणणे आहे. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक पूजा बक्षी करीत आहेत. (वार्ताहर)