शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिबंधित क्षेत्रातही पुन्हा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 00:51 IST

नाशिक : लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर शहरात बाधितांची संख्या वाढतच असून, बुधवारी (दि. १०) २८ रुग्ण आढळल्याने ही संख्या ५१२ झाली आहे. तर सध्या हॉटस्पॉट असलेल्या नाईकवाडीपुरा भागात तिसरा बळी गेला. बुधवारी या भागात एका ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याने शहरातील बळींची संख्या २३ झाली आहे.

नाशिक : लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर शहरात बाधितांची संख्या वाढतच असून, बुधवारी (दि. १०) २८ रुग्ण आढळल्याने ही संख्या ५१२ झाली आहे. तर सध्या हॉटस्पॉट असलेल्या नाईकवाडीपुरा भागात तिसरा बळी गेला. बुधवारी या भागात एका ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याने शहरातील बळींची संख्या २३ झाली आहे.बुधवारी (दि.१०) सायंकाळी शहरात पाच बाधित आढळले. यात एका मृत्यू झालेल्या संशयितालादेखील कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नाईकवाडीपुरा येथील या वृद्धाचा बुधवारी मृत्यू झाला. दरम्यान, पंचवटीतच भद्रकाली फ्रुट मार्केट येथील ६२ वर्षीय वृद्धालादेखील कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. याशिवाय जुन्या नाशकातच बडी दर्गा परिसरात राहणाऱ्या एका ६४ वर्षीय वृद्धेलादेखील संसर्ग झाला आहे. सातपूर-अंबड लिंकरोडवर पाटीलनगर परिसरात एका ४३ वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर दुसरीकडे सिडकोतील लेखानगर भागात एका ६१ वर्षीय वृद्धाचा आणि नाशिकरोड येथील जयभवानी रोडवरील एका ४१ वर्षीय पुरुषालादेखील कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. रात्री सहा रुग्ण पॉझिटिव्ह आले असून, त्यात जुन्या नाशकातील अजमेरी चौक भागातील दोन, मुंबई नाक्यावरील भाभानगरातील दोन आणि नाशिकरोड येथील सुभाषरोड आणि शहरातील अशोका मार्ग परिसरात एक बाधित आढळला आहे. तर रात्री उशिरा महानगरात अजून १६ रुग्ण बाधित आढळून आल्याने एकुण बाधित संख्या ५१२ वर पोहचली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक