शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

चेहऱ्यातील साधर्म्याने निष्पाप तुषारचा बळी

By admin | Updated: May 27, 2017 00:13 IST

नाशिकरोड :निकम याच्या खुनातील फरार संशयित बंडू मुर्तडक असल्याचे समजून हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात तुषार साबळे याचा बळी गेल्याची बाब समोर आली आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : पंचवटीतील किरण निकम याच्या खुनातील फरार संशयित बंडू मुर्तडक असल्याचे समजून त्याचा काट काढण्यासाठी हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात निष्पाप तुषार साबळे याचा नाहक बळी गेल्याची बाब समोर आली आहे. गुरुवारी जेलरोड येथील मंगलमूर्तीनगर येथे टोळक्याने तुषारची भरचौकात हत्या केली होती. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी वडाळा नाका महालक्ष्मी चाळीतील चौघा संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर तुषारचा चेहरा, आणि देहबोली संशयित बंडू मुर्तडकशी मिळतीजुळती असल्याने तुषारवर हल्ला करण्यात आल्याचे हल्लेखोरांनी सांगितले. उपनगर पोलिसांनी मोठ्या शिताफीने संशयित अक्षय आत्माराम अहिरे (२२), अमोल विष्णू गांगुर्डे (२६), करण राजू लोट (२१) रा. महालक्ष्मी चाळ, वडाळा नाका, नितीन किरण पवार (१९) रा. बजरंगवाडी या चौघांना अटक केली आहे. याबाबत माहिती देतांना पोलीस सूत्रांनी सांगितले की, पंचवटीतील पेठरोडवर गेल्या गुरुवारी रात्री किरण निकम याचा चौघा जणांनी धारदार शस्त्राने निर्घृण खून केला होता. याप्रकरणी संतोष उघडे, बंडू मुर्तडक फरार आहेत. फरारी मुर्तडक हा जेलरोड मंगलमूर्तीनगर परिसरात असल्याची माहिती अमोल गांगुर्डे याने गुरुवारी दुपारी शेखर निकम याला दिली. त्यानंतर निकम व इतर त्याचे साथीदार तीन गाड्यांमधून मंगलमूर्तीनगर परिसरात दाखल झाले. तर पवन लोट, सुमित लोट, अमोल गांगुर्डे, करण लोट आदी मोटारसायकलवरून मंगलमूर्तीनगर परिसरात आले. हर्ष अपार्टमेंटच्या वाहनतळात असलेल्या बाकड्यावर अक्षय जाधव, तुषार साबळे व इतर दोघेजण गप्पा मारत बसले होते. चारचाकी व दुचाकी वाहनावरून आलेल्या हल्लेखोरांनी हवेत गोळीबार करत शस्त्रे घेऊन बाकड्यावर बसलेल्या या चौघांच्या मागे धावले. अक्षय व इतर दोघेजण इमारतीमध्ये पळाले. तर कसाऱ्याहून पाहुणा म्हणून आलेला तुषार हा इमारतीच्या पाठीमागील बाजूकडे धावला. फरारी बंडू मुर्तडक व तुषार साबळे यांची शरीरयष्टी एकसारखी असल्याने हल्लेखोरांनी बंडू समजून तुषार याच्यावर कोयते व इतर हत्यारांनी वार करून गंभीर जखमी केले. तर शेखर याने आपल्या जवळील गावठी कट्ट्यातुन तुषारच्या छातीच्या डाव्या बाजुला गोळी झाडली. यामध्ये तुषार जागेवरच गतप्राण झाल्याचे पोलिसांनी सांगितले.उपनगर पोलिसांनी गोपनीय माहिती नुसार चौघा संशयितांना त्यांच्या घरातून शुक्रवारी ताब्यात घेतले. गुन्ह्याची उकल उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव महाजन, दुय्यम पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण, उपनिरीक्षक महेश शिंदे, गजानन इंगळे, गणेश जाधव, हवालदार के.टी. गोडसे, सुनील कोकाटे, विजय गवांडे, रोहित भावले, सुधीर काकड, किरण देशमुख, भगीरथ हांडोरे, सुनील लोहरे आदिंनी केली आहे.