शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

यात्रेपूर्वीच दोनशे बोकडांचा बळी

By admin | Updated: February 20, 2016 22:02 IST

वडांगळी : सतीमाता-सामतदादांचा आजपासून यात्रोत्सव

वडांगळी : वैशिष्ट्यपूर्ण परंपरा व रूढी जपणाऱ्या देशभरातील बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या वडांगळी येथील सतीमाता व सामतदादा यात्रोत्सवास रविवार (दि. २१) पासून प्रारंभ होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक व करमणुकीच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. दरम्यान, यात्रेला प्रारंभ होण्यापूर्वीच दोनशेहून अधिक बोकडांचा बळी देत बंजारा भाविकांनी नवसपूर्तीस प्रारंभ केला आहे. प्रतिवर्षी माघ पौर्णिमेस होणाऱ्या यात्रेच्या निमित्ताने येथे बंजारा समाजाचा जणू कुंभमेळाच भरत असतो. या समाजातील महिला व पुरुषांनी काळाच्या ओघात आपली पारंपरिक वेशभूषा बाजूला सारल्याचे दिसत असले तरी आपल्या रूढी, प्रथा व परंपरा मात्र सोडल्याचे दिसत नाही. धोतर अथवा चोळणा, अंगरखा आणि डोक्यावर लाल रंगाचे पागोटे असा या बंजारा समाजातील पुरुषांचा पूर्वीचा पेहराव असे, तर लाल रंगाचा घागरा, चोळी, कशिदा, कवड्या व आरशांच्या तुकड्यांनी सजविलेली भडक ओढणी, हातात हस्तीदंती कडे, शिंंगांच्या व पितळेच्या बांगड्या असा महिलांचा पोशाख मोठ्या प्रमाणावर दिसायचा. तथापि, कालपरत्वे राहणीमानात बदल दिसत असून पुरुष इतरांसारखे शर्ट-पॅण्ट तर स्त्रिया सहावारी साड्या परिधान करू लागल्या आहेत. या समाजाकडून पूर्वी ऊस तोडणीची कामे मोठ्या प्रमाणावर केली जात. मात्र शैक्षणिक सुविधा सर्वत्र उपलब्ध झाल्याने अनेकजण उच्चशिक्षण घेऊन नोकरी-व्यवसाय करू लागल्याचेही आढळून येते. प्रथमश्रेणी अधिकारी म्हणून काहीजण कार्यरत आहेत. इतकेच नव्हे तर राजकीय क्षेत्रातही यांनी आपला ठसा उमटविला आहे. कै. वसंतराव फुलसिंग नाईक, कै. सुधाकरराव नाईक यांनी राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषविले. विद्यमान महसूल राज्यमंत्री संजय राठोड हेही याच समाजाचे आहेत. गळीत हंगामात ऊस तोडणीसाठी आजही ग्रामीण भागात या समाजाचे तांडे मोठ्या संख्येने काम करताना आढळतात.प्रवासाची साधने कमी असल्यापासून बंजारा भाविक विदर्भ-मराठवाड्यातून बैलगाड्यांत बसून शेकडो मैलांचा प्रवास करीत यात्रेसाठी येत असत; मात्र आर्थिक स्थिती उंचावलेले बंजारा बांधव बदलत्या काळात स्वत:च्या वातानुकूलित वाहनातून यात्रेसाठी येतात. राहणीमानात बदल झाला; मात्र त्यांचे अंतरंग रूढी, प्रथा व परंपरांना धरून असल्याचे दिसते. संततीप्राप्ती, विवाह, नोकरी आदिंच्या नवसपूर्तीसाठी एका कुटुंबाकडून किमान १ ते ५ बोकडांचे बळी दिले जातात. यात्रा काळात उघड्यावर बोकडबळी देण्यावर बंदी घालण्यात आल्यामुळे ट्रस्टच्या वतीने स्वतंत्र वधगृह बांधण्यात आले आहे. यामुळे उघड्यावरील बोकडबळीला आळा बसला आहे; मात्र बोकडबळी बंद करण्यासाठी अद्याप तरी एकाही संस्थेला विशेष यश लाभल्याचे दिसत नाही. अनेक संस्था केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी तात्पुरते प्रबोधन करीत असल्याची चर्चा आहे. उघड्यावर होणाऱ्या बोकडबळींना मज्जाव केल्याने ते वधगृहात होत आहेत. ट्रस्ट व प्रशासकीय यंत्रणेचे यश एवढ्यापुरते सीमित आहे; मात्र सेवाभावी संस्थांनीच आवाज उठवून ते करण्यास भाग पाडले. बोकडबळी पूर्णत: बंद करण्यात संस्थांना यश मिळाले नसले तरी या संस्थाही खचलेल्या नाहीत. त्यामुळे आज ना उद्या नवसासाठीचे बोकडबळी बंद होतील अशी आशा पुरोगामी कार्यकर्त्यांना वाटते आहे. (वार्ताहर) दरम्यान, यात्रा सुरू होण्यापूर्वी गेल्या आठवडाभरात भाविकांनी नवसपूर्तीसाठी सुमारे दोनशेहून अधिक बोकडांचा बळी दिला आहे.