शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांत साठ झाडांचा बळी

By admin | Updated: June 5, 2017 00:34 IST

नाशिक : सलग दोन वर्षांपासून मान्सूनपूर्व पावसाचा वादळी वाऱ्यासह शहराला तडाखा बसत आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सलग दोन वर्षांपासून मान्सूनपूर्व पावसाचा वादळी वाऱ्यासह शहराला तडाखा बसत आहे. गेल्या वर्षीदेखील मान्सून सुरू होण्याअगोदर वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने तीस झाडे उन्मळून पडली होती. याच घटनेची यंदाही शनिवारी (दि.३) पुनरावृत्ती झाली. दोन वर्षांत वादळी वाऱ्याने शहरातील साठ झाडांचा बळी गेल्याचे अग्निशामक विभागाकडे आलेल्या ‘कॉल’च्या नोंदीवरून स्पष्ट होते.शनिवारी दुपारपासून शहरासह उपनगरीय भागांमध्ये अचानकपणे सुरू झालेला वादळी वारा व पावसाने शहरात एकूण तीस वृक्षांचा बळी घेतला. वृक्ष कोसळल्याने सुदैवाने कोठेही कोणालाही दुखापत झाली नाही. शहरातील विविध भागांमध्ये झाड कोसळून त्याखाली वाहने दबल्याच्याही घटना घडल्या आहेत. सिल्व्हरओक, काशिद, पॅतोडिया, गुलमोहर, अकेशिया, रेन ट्री, पेल्ट्राफ ोरम यांसारखे ठिसूळ प्रजातीचे वृक्ष वादळी वाऱ्याने कोसळल्याचे वृक्षप्रेमींनी सांगितले. सातपूर भागातील शिवाजीनगर, अशोकनगर, श्रीकृष्ण कॉलनी, मुंबई नाका, त्र्यंबकरोड, पंचवटी, दहीपूल, महात्मानगर, काठे गल्ली, कॉलेजरोड, पखालरोड आदि भागात वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. एकूणच गेल्या वर्षीदेखील जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या वादळी पावसाने तीस झाडे कोसळली होती. यावर्षीदेखील तीस झाडे उद्ध्वस्त झाली आहेत. या घटनांमध्ये काही ठिकाणी वाहनांचे नुकसानही झाले आहे. बहुतांश ठिकाणी कोसळलेल्या झाडांमध्ये भारतीय प्रजातींचा समावेश नव्हता.यंदा वृक्षसंपदेला मोठा फटका४यावर्षी महापालिकेने न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबाजवणी करत गंगापूररोडवरील दुतर्फा असलेली झाडे भुईसपाट केली. यावेळी शेकडो वृक्ष भर उन्हाळ्यात जमीनदोस्त करण्यात आली. अशाच प्रकारे दिंडोरीरोड, पेठरोड, टाकळीरोड परिसरातही वाहतुकीला अडथळा होत असल्याने वृक्ष काढण्यात आले. शनिवारी झालेल्या वादळी वाऱ्याने तीस वृक्षांचा बळी घेतला. यामुळे यंदा शहरातील वृक्षसंपदेला मोठा फटका बसला आहे. महापालिकेने जेवढे वृक्ष तोडले त्या बदल्यात ठेकेदारांमार्फत लागवड केलेल्या रोपट्यांचे वृक्षांमध्ये रूपांतर करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची गरज असल्याची अपेक्षा जागतिक पर्यावरण दिनानिमित्त केली जात आहे.