शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजाच्या संतापाचा उद्रेक!

By admin | Updated: June 2, 2017 02:07 IST

नाशिक : शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, बिनव्याजी कर्ज यांसह विविध मागण्यांसाठी गुरुवारपासून बेमुदत संपावर उतरलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, बिनव्याजी कर्ज यांसह विविध मागण्यांसाठी गुरुवारपासून बेमुदत संपावर उतरलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. दूध व भाजीपाल्यासह शेतमालाची वाहतूक करणारी वाहने अडवून त्यातील माल रस्त्यावर फेकण्याचे तसेच लूटमार करण्याच्या घटना घडल्याने पोलिसांना बळाचा वापर करून काही ठिकाणी लाठीमार, तर येवल्यात गोळीबार करावा लागला. यात कोणी जखमी झाले नसले तरी, निफाड, नैताळे, लासलगाव, येवला आदी गावांमध्ये तणावसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या या संप काळात जिल्ह्यातील बाजार समित्या पोलीस बंदोबस्तात दिवसभर सुरू असल्या तरी, शेतकऱ्यांनी लिलावासाठी मालच न आणल्याने कोणताही व्यवहार होऊ शकलेला नाही, मात्र शेतकऱ्यांनी वा बाजार समित्यांनी पोलीस बंदोबस्ताची मागणी केल्यास त्यांचा माल अन्य जिल्ह्यांत अथवा वाशी, मुंबईकडे पाठविण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. जिल्"ात संकलित होणाऱ्या तीन लाख लिटर दुधाचा सर्वांत मोठा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला असून, बुधवारी अनेक ठिकाणी दुधाचे टॅँकर अडवून ठेवण्यात आल्याने दुधाचे वितरण होऊ शकले नाही, मात्र शुक्रवारपासून खऱ्या अर्थाने दूध टंचाईला शहरवासीयांना सामोरे जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागाप्रमाणे नाशिक शहरातही शेतकरी संपाची झळ बसली असून, नाशिक बाजार समितीत सकाळी संतप्त शेतकऱ्यांनी भाजीपाला विक्रीसाठी आलेल्या विक्रेत्यांचा शेतमाल फेकून देत, काही व्यापाऱ्यांचे गुदामेही फोडून त्यातील मालाची नासधूस केली आहे. नाशिक तालुक्यातील गिरणारे येथे शेतकऱ्यांनी जिल्हा बॅँकेच्या मालमत्ता जप्तीच्या नोटिसांची होळी करून, कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. या आंदोलनाची सुरुवात येवला-कोपरगाव येथे पहाटे झाली. शेतमाल वाहून नेणाऱ्या एका टेम्पोमध्ये मांस वाहतूक होत असल्याच्या संशयावरून आंदोलकांनी टेम्पो अडविला व त्याच्या चालकाला बेदम मारहाण करीत टेम्पो पेटवून दिला. त्यामुळे कोपरगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली, जमाव हिंसक झाल्याचे पाहून पोलिसांनी बळाचा वापर करून त्याला पांगविण्याचा प्रयत्न केल्याने परिस्थिती शांत होण्याऐवजी आणखीच चिघळली, परिणामी दोन ते तीन हजार शेतकरी रस्त्यावर उतरले व त्यांनी येईल ती वाहने अडवून त्यातील माल रस्त्यावर फेकून दिला. शेतकरी आंदोलनाचे पडसाद निफाड-येवला रोडवरील लासलगाव, नैताळे येथेही उमटले. शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करून वाहने अडविली, सकाळच्या सुमारास बाजार समितीकडे माल घेऊन जात असलेले ट्रॅक्टर, टेम्पो अडवून त्यातील डाळींब, आंबा, कांदे आदी माल रस्त्यावर फेकण्यास सुरुवात केली, त्यामुळे वाहनचालकांनी जिवाच्या भीतीने वाहने रस्त्यावरच सोडून पळ काढला, परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलीस व दंगा नियंत्रण पथकाने धाव घेत लाठीमार करून आंदोलकांना पांगविले. निफाड येथेही शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येत बाजार समितीत जाऊ पाहणारी वाहने अडवून माघारी फिरविली, तर दिंडोरी येथे पालखेड फाट्यावर आंदोलकांनी अचानक रास्ता रोको करून वाहतूक काहीकाळ रोखून धरली. नाशिक-त्र्यंबकरोडवरील तुपादेवी फाटा येथेही शेतकऱ्यांनी शेतमाल घेऊन जाणारी वाहने अडविली. जिल्"ातील ग्रामीण भागात तसेच नाशिक शहरात ठिकठिकाणी शेतमालाचे शेकडो वाहने लूटमारीच्या भीतीने रस्त्याच्या कडेला उभे करण्यात आले असून, काही कंपन्यांना परदेशात माल वेळेत निर्यात करायचा असल्याने त्यांची कोंडी झाली आहे.