शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

मनपा निवडणुकांसाठी आंबेडकर भवनाचा बळी

By admin | Updated: July 21, 2016 01:05 IST

कांगो : पदवीधरसाठी राजू देसले यांना उमेदवारी

 नाशिक : मागील महिन्यात मुंबईचे आंबेडकर भवन पाडण्यामागे दलितांमध्ये फूट पाडण्याचा डाव सरकारचा होता. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकार जातिअंताच्या चळवळीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्यसचिव डॉ. भालचंद्र कांगो यांनी पत्रकार परिषदेत केला.नाशिक विभागातून पदवीधर मतदारसंघाच्या चालू वर्षाच्या निवडणुकीसाठी प्रकाश (राजू) देसले यांना उमेदवारी देण्यात आल्याची अधिकृत घोषणा कांगो यांनी पत्रकार परिषदेत केली. जिल्हासचिव देसले हे मागील अनेक वर्षांपासून शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी पक्षाच्या माध्यमातून लढा देत आहे. त्यामुळे त्यांच्या नावाचा पक्षाने विचार केला असून सर्व १९ डाव्या संघटनांनी देसले यांना पाठिंबा दर्शविल्याचे कांगो यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, ते म्हणाले चैत्यभूमी, दीक्षाभूमी आणि आंबेडकर भवन या वास्तू बाबासाहेबांनी जनतेच्या पैशामधून उभ्या केल्या आहेत. एकीकडे सरकार बाबासाहेबांचे १२५वे जयंती वर्ष गाजावाजाने साजरे करत असताना दुसरीकडे सरकारच बाबासाहेबांचे विचार व त्यांच्या वास्तू नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे, हा विरोधाभास कोणालाही मान्य नसून सरकारने आंबेडकर भवनाच्या पुनर्निर्माणासाठी कुठलाही अडथळा आणू नये, असे कांगो म्हणाले. तसेच सरकारने केलेली जीडीपी वाढ व महागाई नियंत्रणाचे दावे फोल ठरले आहेत. या सरकारने विकास आणि स्वयंरोजगाराचा संदर्भ जोडत विविध योजना गोंडस नावाखाली घोषित केल्या; मात्र भांडवलदारांचे हित साधत वनजमिनी त्यांच्या घशात घालून पर्यावरणाचा नाश करत भावी पिढीच्या हातात भकास विकास द्यायचा हे चुकीचे आहे. पर्यावरण, कामगार, रोजगार अशा सर्वच बाबतीत सरकारचे धोरण जनहिताच्या विरोधात असल्याचा आरोप कांगो यांनी बोलताना केला.सर्व पुरोगामी विचाराचे पक्ष सरकारी धोरणांच्या विरोधात संघर्ष करण्यास तयार असून सर्व डावे पक्ष जनआंदोलन उभे करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. २ सप्टेंबर रोजी कामगारविरोधी सरकारी धोरणांच्या निषेधार्थ राष्ट्रीय संप पुकारणार असल्याचे त्यांनी याप्रसंगी स्पष्ट केले. यावेळी राजू देसले, पी. डी. धनवटे, अ‍ॅड. मनीष बस्ते आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)