शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
2
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
3
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
4
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
5
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
6
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
7
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
8
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
9
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
10
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
11
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
12
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
13
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
14
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
15
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
16
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
17
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
18
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
19
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
20
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?

उपाध्यक्षांनी नाकारली २५ लाखांची ‘आॅफर’

By admin | Updated: September 12, 2014 00:44 IST

उपाध्यक्षांनी नाकारली २५ लाखांची ‘आॅफर’

नाशिक : जिल्हा परिषदेतील निधी नियोजनाचा वाद विभागीय आयुक्तांच्या दरबारी पोहोचला असतानाच, आता उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांना हा वाद मिटविण्यासाठी २५ लाखांची गंगाजळी देण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. ज्या कर्मचाऱ्याने ही ‘आॅफर’ आणली त्या कर्मचाऱ्यावर मात्र त्याच्या मूळ आस्थापनेच्या ठिकाणी त्याची रवानगी करण्याची तक्रार उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांनी संबंधित विभागाच्या खातेप्रमुखांकडे केली आहे.जिल्हा परिषदेच्या सेस निधीचे असमान वाटप झाल्याची तक्रार करीत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांच्यासह चारही सभापती ज्योती माळी, अलका जाधव, राजेश नवाळे व सुनीता अहेर यांच्यासह तब्बल ३१ सदस्यांनी विभागीय आयुक्तांना जिल्हा परिषदेच्या बैठकांमध्ये विधिसंमत ठराव झाले नसल्याची तक्रार करून या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली आहे. या ३१ मधील राष्ट्रवादीच्या दोन आणि सेनेच्या दोन सदस्यांनी नंतर आमची तक्रार नसल्याचे पत्र प्रशासनाला दिले आहे. तसेच ४१ सदस्यांनी या निधी नियोजनाच्या वादात झालेले ठराव योग्य असून, अध्यक्षांनी केलेले नियोजन व्यवस्थित असल्याचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विभागीय आयुक्तांना दिले आहे. दरम्यानच्या काळात अध्यक्ष जयश्री पवार यांनी दोन वेळा प्रशासनाला पत्र लिहून आपण केलेले नियोजन पुन्हा फेरनियोजन करण्यासाठी तत्काळ जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा बोलावण्याची मागणी केली होती. मात्र, कमी वेळेत विशेष सभा घेता येत नसल्याचे प्रशासनाने कळविले होते. आता या निधी नियोजनाला वेगळेच वळण लागले असून, उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांना हा वाद मिटविण्यासाठी जिल्हा परिषदेतील एका कर्मचाऱ्याने मध्यस्थी करीत चक्क २५ लाखांची आॅफर दिल्यानंतर सकाळे यांनी त्यास नकार देत सर्व सदस्यांना समान न्याय द्या, आपल्याला काही नको, असे सांगत या कर्मचाऱ्यास उलटपावली परत पाठविल्याचे समजते. त्यानंतर गुरुवारी (दि. १२) उपाध्यक्षांनी संबंधित कर्मचाऱ्याची आस्थापना असलेल्या खातेप्रमुखास बोलावून घेऊन या कर्मचाऱ्याची मूळ आस्थापनेवर रवानगी करण्याची सूचना केली आहे. (प्रतिनिधी)