शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
3
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
4
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
5
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
6
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
7
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
8
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
9
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
10
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
11
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
12
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
13
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
15
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
16
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
17
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
18
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
19
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
20
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!

पहिल्याच दिवशी झारखंडला चार सुवर्ण नाशिकच्या रूपालीला तीन रौप्य

By admin | Updated: May 22, 2014 00:19 IST

शालेय राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धा : महाराष्ट्र दुसर्‍या स्थानी

शालेय राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धा : महाराष्ट्र दुसर्‍या स्थानी नाशिक : येथे आजपासून प्रारंभ झालेल्या १९ वर्षांआतील शालेय राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी वैयक्तिक गटामध्ये झारखंडने तीन सुवर्णपदकांसह सांघिक गटातही सुवर्णपदक पटकावले. महाराष्ट्राकडून खेळताना नाशिकच्या रूपाली यमगर हिने दोन रौप्यपदकांसह एक कांस्यपदक पटकावले, तर सांघिकमध्येही संघाला रौप्यपदक प्राप्त करून देण्यात तिचा मोलाचा वाटा राहिला. छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या मैदानावर शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय व नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५९ व्या राष्ट्रीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेला प्रारंभ झाला. स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा ध्वजारोहण व दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी नाशिक जिमखान्याचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, ॲड. गोरखनाथ बलकवडे, आनंद खरे, राष्ट्रीय तलवारबाज खेळाडू अजिंक्य दुधारे, क्रीडा उपसंचालक जगन्नाथ अधाणे, जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे सचिव प्रमोद चांदुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सदर स्पर्धेसाठी हरियाणा, मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, राज्यस्थान, ओरिसा, आंध्र प्रदेश, पंजाब, छत्तीसगड, चंदीगढ, दिल्ली, महाराष्ट्र, विद्या भारती, गुजरात, झारखंड यांसह १७ राज्यांचे सुमारे २९० तिरंदाज सहभागी झाले आहेत. तीनदिवसीय सदर स्पर्धेच्या पहिल्या दिवशी मुलींच्या गटाचे सामने झाले. यात ५० मीटर, ३० मीटर आणि सर्वसाधारण गटात झारखंडने तीन सुवर्णपदक पटकावत पदतालिकेत आघाडी घेतली आहे. दोन रौप्यपदकांसह महाराष्ट्र दुसर्‍या स्थानी आहे. सांघिक गटातही झारखंडनेच बाजी मारली असून, महाराष्ट्राच्या मुली दुसर्‍या स्थानी आहेत. निकाल : मुली :५० मीटर : सोबांरी बारी (झारखंड - सुवर्ण), सोनी कुमारी (झारखंड - रौप्य ), रूपाली यमगर (महाराष्ट्र - कांस्य).३० मीटर : सोनी कुमारी (झारखंड - सुवर्ण), रूपाली यमगर (महाराष्ट्र - रौप्य ), अनिता (दिल्ली - कांस्य).सर्वसाधारण : सोनी कुमारी (झारखंड - सुवर्ण), रूपाली यमगर (महाराष्ट्र - रौप्य), सोबांरी बारी (झारखंड - कांस्य).सांघिक मुली : झारखंड (सुवर्ण) : कलावती कुमारी, जयललिता कुमार, सोनी कुमारी, सोबांरी बारी.महाराष्ट्र (रौप्य) : स्वाती नगरकर, रूपाली यमगर, मोहिनी गाडेकर, केतकी शिंदे.दिल्ली (कांस्य) : सत्कीर्ती, चिनू, अनिता, आरतीकुमारी.