शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

प्रारुप मतदार याद्यांची तपासणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 00:48 IST

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक शाखेच्या वतीने सुरू असलेल्या पूर्वतयारीनुसार जिल्हा निवडणूक शाखेत मतदार याद्यांच्या तपासणीचे काम सुरू झाले आहे.

नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक शाखेच्या वतीने सुरू असलेल्या पूर्वतयारीनुसार जिल्हा निवडणूक शाखेत मतदार याद्यांच्या तपासणीचे काम सुरू झाले आहे. जिल्ह्यातील एकूण १५ विधानसभा मतदारसंघांतील मतदारांची एकूण आकडेवारी प्रसिद्ध झाल्यानंतर आता सदर याद्यांच्या तपासणीचे काम सुरू करण्यात आले आहे.लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर जिल्हा निवडणूक शाखेच्या वतीने मतदारयाद्या परिपूर्ण आणि दोषरहित करण्यासाठी जिल्हाभर व्यापक मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेत सर्वसामान्य नागरिक तसेच विद्यार्थ्यांच्या सहकार्याने नागरिकांना मतदार नोंदणीबाबत जागरूक करण्याची मोहीम महत्त्वाची ठरली. या मोहिमेमुळे मतदारांपर्यंत पोहोचण्यात यश आले आणि त्याचाच परिणाम म्हणून जवळपास ४० हजार मयत आणि दुबार मतदारांची नावे यादीतून वगळ्यात आली, तर सुमारे २८ हजार नवीन मतदारांच्या नावांची नोंदणी होऊ शकली. मतदार कर्मचाऱ्यांनी बजावलेल्या भूमिकेमुळेदेखील सदर काम वेळेत पूर्ण होऊ शकल्यामुळे निवडणुकीच्या तयारीला वेळ मिळाला आहे.जिल्हाधिकारी सूरज मांढरे आाणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी केलेल्या नियोजनानुसार १५ जुलै रोजी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्याची तारीख निश्चित केलेली असल्यामुळे मतदार कर्मचाऱ्यांबरोबरच निवडणूक नायब तहसीलदार, निवडणूक लिपिक यांच्याबरोबरच निवडणूक विभागाच्या कर्मचाºयांनी दिलेल्या मुदतीत काम करून जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकाºयांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे प्रारूप मतदारयाद्या तयार झालेल्या आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निवडणूक शाखेजवळ सध्या या मतदार याद्यांची तपासणी सुरू झाली असून, कर्मचारी कामाला लागले आहेत. याद्यांची बिनचूक छपाई, पाने तसेच मतदार याद्यांचा क्रम तसेच मतदारांची छायाचित्रे आदींची तपासणी करूनच त्यावर निवडणूक शाखेचे शिक्के मारले जात आहेत.ओळखपत्रांची प्रतीक्षानिवडणूक शाखेने आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी चालविली असली तरी मतदारांना मात्र ओळखपत्राची प्रतीक्षा आहे. पूर्वीच्या ओळखपत्रातील त्रुटी, फोटोंचा दर्जा सुमार असल्याने मतदारांना स्मार्ट ओळखपत्र या निवडणुकीत मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र सदर संपूर्ण प्रक्रिया ही दिल्लीहून होत असल्यामुळे निवडणुकीपर्यंत ओळखपत्र मतदारांना मिळतील का असा प्रश्न मतदारांकडून उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकvidhan sabhaविधानसभा