शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीसाठी २१ हजार मतदान यंत्रांच्या पडताळणीची कामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 00:51 IST

जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांसाठी केव्हाही निवडणुकीची घोषणा होऊ शकते, अशी शक्यता गृहीत धरून जिल्हा निवडणूक विभागाने सुरू केलेल्या निवडणुकीच्या तयारीला चांगलाच वेग आला आहे.

नाशिक : जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांसाठी केव्हाही निवडणुकीची घोषणा होऊ शकते, अशी शक्यता गृहीत धरून जिल्हा निवडणूक विभागाने सुरू केलेल्या निवडणुकीच्या तयारीला चांगलाच वेग आला आहे. जिल्ह्याची अंतिम मतदारयादी जाहीर करण्यात आली असून, यंत्रांच्या पडताळणी कामालाही वेग आलेला आहे. जवळपास २१ हजार मतदान यंत्रांची पडताळणी पूर्ण करण्यात आलेली आहे. विशेष सुटीच्या दिवशी निवडणूक कर्मचाऱ्यांनी यंत्रे पडताळणीची कामे केली.विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने निवडणूक कामात कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी जिल्हा निवडणूक विभागाकडून विशेष काळजी घेतली आहे. रविवारी सुटीच्या दिवशीही कर्मचाऱ्यांनी निवडणूक संदर्भातील कामे केली. निवडणुकीसाठी ३ हजार ७५५ मतदान यंत्रे नाशिकसाठी प्राप्त झाली आहेत. ही यंत्रे अंबड येथील वेअरहाउसमध्ये ठेवण्यात आली असून, या ठिकाणी सदर मतदान यंत्रांची तांत्रिक तपासणी केली जात आहे.जिल्ह्यातील पंधरा मतदारसंघांसाठी होणाºया निवडणुकीच्या तयारीला चांगलाच वेग आला आहे. मतदानासाठी राज्यात मोठ्या संख्येने व्हीव्हीपॅट, कंट्रोल युनिट, ईव्हीएम ही यंत्रे लागणार आहेत. त्यासाठी निवडणूक आयोगाकडून उत्तर प्रदेश, तामिळनाडू, पुणे व बंगळुरू येथील बेल कंपनीकडून यंत्रे उपलब्ध करून दिली जात आहेत. नाशिकला बंगळुरू येथील बेल कंपनीकडून यंत्रे मिळाली आहेत.अचूक मतदार याद्यांसाठी मोहीमजिल्हा निवडणूक विभागाने मतदारयादी आणि मतदान यंत्रे या दोन्ही कामाला एकाचवेळी सुरुवात केल्याने दोन्ही कामे वेळेत पूर्ण झालीच शिवाय नागरिकांपर्यंत मशीन वापरण्याबाबतची प्रात्यक्षिकेदेखील पोहचविता आली. सातत्याने अहोरात्र निवडणुकीच्या कामासाठी कर्मचारी कामकाज करीत असल्यामुळे निवडणुकीतील पारदर्शकता वाढणार आहे. पुढील महिन्यात कधीही निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता असल्याने जिल्हा निवडणूक शाखा कामाला लागली आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुभवानंतर लागलीच विधानसभेसाठी कंबर कसलेल्या निवडणूक शाखेने सर्व बारकाव्यांचा अभ्यास करून संपूर्ण जिल्ह्यात पारदर्शक आणि अचूक मतदार याद्यांसाठी मोहिमा राबविल्या आहेत.सुटीच्या दिवशीदेखील कामेधुळे लोकसभा मतदारसंघातून १ हजार ८६८ बॅलेट युनिट, ९३४ कंट्रोल युनिट व ९३५ व्हीव्हीपॅट यंत्रे प्राप्त झाली आहेत. यापूर्वी सुमारे १० हजार मतदान यंत्रे जिल्हा निवडणूक शाखेला प्राप्त झाली आहेत. अंबड येथे सुरू असलेल्या यंत्रे पडताळणी कामालादेखील वेग आल्याने जवळपास २१,२८७ यंत्राची तपासणी करण्यात आलेली आहे. सुटीच्या दिवशी कर्मचाºयांनी निवडणुकीच्या संदर्भातील कामे केली आहेत.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयElectionनिवडणूक