शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उपक्रमशील : मानवनिर्मित प्रवास साधनांचा घेतला प्रत्यक्ष अनुभव वाघेरा येथील विद्यार्थ्यांची हवाईसफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 00:18 IST

पेठ : सहल म्हटले की, शालेय मुलांसाठी अत्यानंदाचा क्षण. मग साधी परिसर सहल, वनभोजन, क्षेत्रभेट असो, की महामंडळाच्या लालपरीतून देवदर्शन.

ठळक मुद्देऔरंगाबाद ते मुंबई अशी विमानाने हवाई सफरविमानाने सहलीचा अनुभव

पेठ : सहल म्हटले की, शालेय मुलांसाठी अत्यानंदाचा क्षण. मग साधी परिसर सहल, वनभोजन, क्षेत्रभेट असो, की महामंडळाच्या लालपरीतून देवदर्शन. त्यात एखादी सहल जर थेट अवकाशातून झेप घेणारी असेल तर मुलांचा आनंद काही विरळाच. असाच एक सुखद अनुभव वाघेरा येथील निवासी आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांनी औरंगाबाद ते मुंबई विमानप्रवास करत मुंबईदर्शन करून घेतला.महाराष्ट्र समाज सेवा संघ, नाशिक संचलित विठ्ठलराव पटवर्धन उत्कर्ष आश्रमशाळा, वाघेरा येथील इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी औरंगाबाद ते मुंबई अशी विमानाने हवाई सफर केली. राज्याच्या इतिहासात प्रथमच आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी विमानाने सहलीचा अनुभव घेतला. या सहलीची वैशिष्ट्ये म्हणजे रस्ते, लोहमार्ग, जल व हवाईमार्ग या सर्व साधनांचा अनुभव घेणे हे होते. येथील उपक्रमशील वर्गशिक्षक राजेश भोये, मुख्याध्यापक संदीप चौधरी यांनी या सहलीचे आयोजन केले होते. यात वाघेरा ते नाशिक बसने, नाशिक ते औरंगाबाद रेल्वेने, औरंगाबाद ते मुंबई विमानाने, मुंबईत समुद्र बोटीने असा नियोजन केल्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी प्रवास अनुभवला. वाघेरा आश्रमशाळा विद्यार्थ्यांना अनेकविध शैक्षणिक अनुभव देण्यासाठी नेहमीच पुढाकार घेते. त्याचदृष्टीने या सहलीचेही आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांसोबत वर्गशिक्षक राजेश भोये, मुख्याध्यापक संदीप चौधरी, शिक्षक रंजना तायडे, रंजना खंबाईत, अधीक्षिका संगीता मालुंजकर होते. सहलीदरम्यान दोन दिवस विद्यार्थ्यांचा भोजन खर्च शिवाजी नागरे व शांताराम मानभाव यांनी सामाजिक जाणीव ठेवत स्वखर्चाने केला. सहलीदरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधला.शाळेच्या या आगळ्या-वेगळ्या सहलीबद्दल संस्थाप्रमुख चंद्रकांत धामणे, सचिव सुधाकर साळी व सर्व संस्था पदाधिकारी, माध्यमिक मुख्याध्यापक नितीन पवार सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालकांनी कौतुक केले.