शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर उभी राहणारी वाहने मनपाकडून ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 01:29 IST

साईनाथनगर चौफुलीलगत जॉगिंग ट्रॅकवर अनधिकृत वाहनतळ निर्माण करून थेट मुख्य रस्त्यावरच मोठ्या प्रमाणावर दुचाकी व चारचाकी वाहने उभी करून रस्ता वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध महापालिकेच्या पूर्व विभागाने सोमवारी धडक मोहीम राबवून जॉगिंग ट्रॅकवर लावलेल्या नऊ दुचाकी उचलून नेल्या.

ठळक मुद्देसाईनाथनगर : जॉगिंग ट्रॅक बनला होता अनधिकृत वाहनतळ

साईनाथनगर : जॉगिंग ट्रॅक बनला होता अनधिकृत वाहनतळइंदिरानगर : साईनाथनगर चौफुलीलगत जॉगिंग ट्रॅकवर अनधिकृत वाहनतळ निर्माण करून थेट मुख्य रस्त्यावरच मोठ्या प्रमाणावर दुचाकी व चारचाकी वाहने उभी करून रस्ता वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध महापालिकेच्या पूर्व विभागाने सोमवारी धडक मोहीम राबवून जॉगिंग ट्रॅकवर लावलेल्या नऊ दुचाकी उचलून नेल्या.नाशिक महापालिकेने साईनाथनगर चौफुली ते डीजीपीनगर क्रमांक एकपर्यंत लाखो रुपये खर्च करून जॉगिंग ट्रॅक तयार केला आहे. आरोग्यासाठी चालणे हा उत्तम व्यायाम असल्याने साईनाथनगर, डीजीपीनगर क्रमांक एकसह परिसरातील युवक-युवती आणि ज्येष्ठ नागरिक सकाळ व संध्याकाळ मोठ्या प्रमाणात फेरफटका मारण्यासाठी येतात. त्यामुळे जॉगिंग ट्रॅकवर नेहमीच वर्दळ असते. त्याची दखल घेत महापालिकेच्या पूर्व विभागाच्या अतिक्रमण विभागाने सोमवारी विभागीय अधिकारी रवींद्र धारणकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम राबवून जॉगिंग ट्रॅकमध्ये लावण्यात आलेल्या नऊ दुचाकी उचलून नेल्या. या वाहनांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या मोहीम शिवाजी काळे, गुणवंत वाघ, अजित वजाळे, मुनीर शेख, जीवन ठाकरे आदी कर्मचाऱ्यांनी राबवली.वारंवार तक्रारीसाईनाथनगर चौफुलीलगतच आॅनलाइन परीक्षा केंद्र असल्याने त्याठिकाणी जिल्ह्याच्या विविध भागातून परीक्षेसाठी विद्यार्थी येतात. त्यातील बहुतेक विद्यार्थी सर्रासपणे जॉगिंग ट्रॅकच्या मध्येच चारचाकी आणि दुचाकी वाहने लावतात. त्यामुळे जॉगिंग ट्रॅक आहे की वाहनतळ असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत होता. या वाहनांचा फेरफटका मारण्यास येणाºयांना त्रास होत असल्याच्या तक्रारी वारंवार महापालिकेकडे करण्यात आल्या होत्या. त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. मात्र अखेर यासंबंधी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण