शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

वाहने रस्त्यावरच उभी

By admin | Updated: September 2, 2016 00:50 IST

सार्थकनगर : अपघाताच्या पुनरावृत्तीची शक्यता

इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील सार्थकनगर बसथांब्यासमोर पालकवर्गाची आणि विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांची वाहने रस्त्यावरच उभी राहत असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार येथील नागरिकांनी केली आहे. सेवाकुंज येथे झालेल्या अपघाताची पुनरावृत्ती झाल्यावरच शहर वाहतूक पोलीस विभागाचे डोळे उघडणार आहेत का, असा उपरोधिक प्रश्न नागरिकांकडून करण्यात आला आहे.वडाळा-पाथर्डी रस्त्यालगतच इंदिरानगर, कलानगर, सार्थकनगर, सराफनगर, पांडवनगरी, शरयूनगरी, समर्थनगर यांसह विविध उपनगरे आहेत. त्यामुळे बहुतेक नागरिक वडाळा-पाथर्डी रस्त्याचा वापर करतात. अंबड औद्योगिक वसाहत व देवळालीकॅम्पला हा जवळचा मार्ग असल्याने दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ सुरू असते. नागपूरच्या धर्तीवर रस्त्याचे काम झाल्याने वाहतूक सुरळीत होईल, असे वाटत होते. परंतु सार्थकनगर बसथांब्यासमोर एक प्राथमिक विद्यालय आहे. त्याठिकाणी सकाळी ८ वाजता आणि सकाळी ११ वाजेच्या सुमारास विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी येणाऱ्या पालकांच्या सुमारे ५0 ते ६0 दुचाकी आणि १0 ते १५ चारचाकी वाहने सर्रास वडाळा-पाथर्डी रस्त्यावरच लावली जातात. त्यामुळे सुमारे एक तास सदर रस्ता वाहतुकीस जणूकाही बंदच होतो. त्यामुळे मार्गक्रमण करणाऱ्या वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. परिसरातील रहिवाशांनी अनेक वेळा तक्रार करूनही कोणतीही कारवाई होत नाही. तसेच लगतच असलेल्या अपार्टमेंट व सोसायटीतील रहिवाशांना आत-बाहेर जाणेसुद्धा मुश्कील होत आहे. (वार्ताहर)