शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

वाहनांच्या पाट्या न्यायालयाच्या रडारवर

By admin | Updated: May 9, 2017 02:57 IST

नाशिक : अडीच महिन्यांपूर्वी मालेगाव येथे गोवंश रक्षण समितीचे कार्यकर्ते मच्छिंद्र शिर्के यांना करण्यात आलेल्या मारहाण प्रकरणाने वेगळेच वळण घेतले

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : अडीच महिन्यांपूर्वी मालेगाव येथे गोवंश रक्षण समितीचे कार्यकर्ते मच्छिंद्र शिर्के यांना करण्यात आलेल्या मारहाण प्रकरणाने वेगळेच वळण घेतले असून, शिर्के यांना मारहाण करणाऱ्यांच्या जामिनाला विरोध करताना पोलिसांनी उच्च न्यायालयात सादर केलेली छायाचित्रे पाहून शिर्के यांच्या वाहनावर ‘विश्व हिंदू परिषद, जिल्हा मंत्री’ लावलेली पाटी कायदेशीर आहे काय? याची तपासणी करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. त्याचबरोबर शिर्के हे प्राणी कल्याण अधिकारी आहेत काय? याचाही खुलासा पुढच्या सुनावणी दरम्यान करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. मालेगावातील संगमेश्वर भागात १४ फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला होता. गोवंश रक्षक असलेले मच्छिंद्र शिर्के यांच्या कार्यालयावर जमावाने हल्ला चढवून त्यांच्या सुमो वाहनाची मोडतोड करून शिर्के यांना मारहाण केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात २० ते २५ मारेकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला, त्यात सात जणांना पोलिसांनी अटक केली तर तन्वीरखान खलीलखान यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. या अर्जाची सुनावणी न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्यासमोर झाली. तन्वीरखान याच्या वतीने अ‍ॅड. एजाज नुरमोहमंद शेख यांनी युक्तिवाद केला. तथापि, पोलिसांनी तन्वीरखान याच्या जामिनाला हरकत घेत, हल्लेखोरांनी शिर्के यांच्या मोटारीची मोडतोड केल्याचे छायाचित्रे न्यायालयात सादर केली. न्यायालयाने ही छायाचित्रे पाहिली असता, त्यात शिर्के यांच्या मोटारीवर ‘जिल्हामंत्री, विश्व हिंदू परिषद’ अशी पाटी लावलेली दिसून आली. त्यावर न्यायालयाने पोलिसांना अशा प्रकारची पाटी लावणे नियमबाह्य आहे की कसे याची शहनिशा करण्याची सूचना केली. तसेच पाटी लावणे नियमबाह्य असेल तर पोलिसांनी त्यावर काय कार्यवाही करण्याचे प्रस्तावित केले त्याचा खुलासा पुढील तारखेस करण्याचा हुकूम केला. मच्छिंद्र शिर्के यांचा गोवंश रक्षक असा उल्लेख करण्यात आल्याने त्याचीही न्यायालयाने दखल घेतली. शिर्के हे ‘प्राणी कल्याण अधिकारी’आहेत काय? अशी विचारणा सरकारी वकिलांना केली व त्याबाबतही तपास करून पुढील तारखेस तसा दाखला सादर करण्याची सूचना केली व तन्वीरखान यास १२ जूनपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर केला.