शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
3
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
4
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
5
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
6
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
8
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
9
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
10
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
11
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
12
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
13
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
14
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
15
Women violence: देशात आपल्याच घरात महिलांचा होतोय छळ, आकडे बघा काय सांगताहेत?
16
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
17
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
18
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
19
Mumbai: केतकीपाडा, फिल्मसिटी, दामूनगर येथील झोपड्यांवरील कारवाईला आठ दिवसांची मुदतवाढ
20
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...

वाहनचोरी, घरफोड्या करणाऱ्या दोन सराईतांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 18:25 IST

सिन्नर : नाशिक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्याच्या परिसरात सापळा रचून मोटार वाहनांची चोरी करणारे तसेच घरफोड्या करणाºया परजिल्ह्यातील दोन सराईत संशयितांना जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून पिकअप गाडीसह १ लाख ७९ हजार रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

ठळक मुद्दे १ लाख ७९ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला

सिन्नर : नाशिक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्याच्या परिसरात सापळा रचून मोटार वाहनांची चोरी करणारे तसेच घरफोड्या करणाºया परजिल्ह्यातील दोन सराईत संशयितांना जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून पिकअप गाडीसह १ लाख ७९ हजार रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.३१ आॅक्टोबर २०१८ च्या मध्यरात्रीच्या सुमारास सिन्नर तालुक्यातील सोमठाणे येथील शेतकरी संभाजी परशराम धोक्रट यांची पिकअप गाडी क्र (एमएच ४३ एफ ५४३२) ही अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. याबाबत सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील गुन्ह्यांचा आढावा घेवून गुन्हे उघडकीस करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक अशोक कर्पे यांच्या पथकाने सदर गुन्ह्याचा तपास सुरू केला होता. सदर गुन्ह्याचे आरोपी हे जिल्ह्याच्या सिमावरती भागामध्ये असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेला खबºयामार्फत माहिती मिळाली होती. पथकाने अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्याच्या गणेशनगर साखर कारखाना परिसरात सापळा लावण्यात आला होता. सापळयात संशयीत आरोपी आनंद अनिल काळे (२३) व गणेश भिकन तेलोरे (१९) दोघेही राहणार गणेशनगर ता. राहता जि. अहमदनगर यांना ताब्यात घेतले. वरील गुन्ह्यात चोरीस गेलेली सफेद रंगाची पिकअप गाडी हस्तगत करण्यात आली. संशयीतांकडे अधिक चौकशी केली असता त्यांचे साथीदार राहुल अनिल काळे, शुभम अनिल काळे, भरत काळे, राहुल वाघमारे यांच्यासह सदरचा गुन्हा केल्याची त्यांनी कबुली दिली. त्यांच्या घराची झडती घेतली असता चोरून आणलेले रेडीमेड कपडे व किरणा माल मिळून आला. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण एमआयडीसी येथील कपड्याचे दुकान तर श्रीरामपूर शहर परिसरात किराणा दुकानात चोरी केली असल्याची कबुली संशयित आरोपींनी दिली. संशयितांकडून पिकअप गाडीसह रेडीमेड कपडे व किरणा माल असा एकुन १ लाख ७९ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक कर्पे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम कर्पे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरूण पगारे, पोलीस हवालदार संजय गोसावी, सुशांत मरकड, मंगेश गोसावी, कुणाल मोरे, विशाल आव्हाड, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, संदीप लगड पथकात सहभागी होते.