शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाला व्यापाऱ्यावर टोळक्याचा प्राणघातक हल्ला

By admin | Updated: May 27, 2017 23:19 IST

दिंडोरीरोडवरील मार्केट यार्डमध्ये भाजीपाला विक्रीचा व्यवसाय असलेल्या व्यापाऱ्याच्या भावावर टोळक्याने प्राणघातक हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : दिंडोरीरोडवरील मार्केट यार्डमध्ये भाजीपाला विक्रीचा व्यवसाय असलेल्या व्यापाऱ्याच्या भावावर टोळक्याने प्राणघातक हल्ला केल्याची शनिवारी (दि़२७) रोजी रात्रीच्या सुमारास घडली़ अजय विजय निकम (२५, अवधुतवाडी, दिंडोरी रोड, पंचवटी नाशिक) असे हल्ल्यात जखमी झालेल्या व्यापाऱ्याच्या भावाने नाव असून पंचवटी पोलिसांनी या प्रकरणी एका संशयितास ताब्यात घेतले आहे़पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मार्केट यार्डात सुदीप निकम यांचा भाजीपाल विक्रीचा व्यवसाय आहे़ शनिवारी सायकाळी त्यांना अचानक काम निघाल्यामुळे त्यांनी लहान भाऊ अजय यास मार्केट यार्डमध्ये पाठविले़ मात्र नेहेमीची माणसे कामावर न आल्यामुळे त्यांना पाहण्यासाठी अजय दुचाकीवरून वज्रेश्वरी झोपडपट्टीजवळील शाहू नगरमध्ये गेला़ मात्र कामावरील माणसे न भेटल्यामुळे परतत असताना चार-पाच जणांच्या टोळक्याने त्यास अडवून पैशांची मागणी केली़अजयने या टोळक्यास पैसे कसले द्यायचे अशी विचारणा केली असता यातील काहींनी चॉपरने त्याच्यावर वार केले़ अजयने यातील काही वार चुकविण्याचा प्रयत्न केला असता टोळक्यातील काहींनी त्यास पकडून ठेवले तर त्यातील एकाने डोक्यावर कोयत्याने वार केला़ यामध्ये गंभीर जखमी झालेला अजय जीव वाचवून पोलीस ठाण्यात पोहोचला़ यांनतर त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत़या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी संशयित प्रविण लोखंडे यास ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे़ दरम्यान, संशयितांवर जीवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी अ‍ॅड़सुदीप निकम यांनी केली आहे़ दरम्यान, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़