शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात भाजीपाल्याचे दर भिडले गगनाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 01:04 IST

मालेगाव : तालुक्यासह कसमादे परिसरात काही भागात झालेला जोरदार पाऊस आणि काही भागात असलेल्या रोगट हवामानामुळे भाजीपाल्याचे उत्पादन घटले आहे. बाजारात मागणी तसा पुरवठा होत नसल्याने कांदा, पत्ता कोबी वगळता इतर भाजीपाल्याचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत.

मालेगाव : (शफीक शेख) तालुक्यासह कसमादे परिसरात काही भागात झालेला जोरदार पाऊस आणि काही भागात असलेल्या रोगट हवामानामुळे भाजीपाल्याचे उत्पादन घटले आहे. बाजारात मागणी तसा पुरवठा होत नसल्याने कांदा, पत्ता कोबी वगळता इतर भाजीपाल्याचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत.कसमादे परिसरात यंदा जूनच्या दुसऱ्या सप्ताहात चांगला पाऊस झाल्याने झाल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांसह भाजीपाल्याचीही मोठ्या प्रमाणात लागवड केली. उत्पादन चांगले निघत असल्याने जून महिन्यात बाजार समित्यांमध्ये भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात होत होती. त्यामुळे दर स्थिर होते. गेल्या काही दिवसांपासून रोगट हवामान तसेच काही भागात वारंवार होणाºया पावसामुळे भाजीपाल्याची वाढ खुंटून पिवळा पडला. त्यामुळे आधीच्या तुलनेत भाजीपाल्यांची आवक कमी झाल्याने दर ३५ ते ५० टक्क्यांनी वाढले आहेत. सध्या बाजारात टोमॅटो आणि बटाटे यांचा मोठा तुटवडा आहे. टोमॅटा आणि बटाटे यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. टोमॅटो ३५ ते ४० रुपये तर शिमला मिरची ४५ ते ५० रुपये प्रति किलोने विकला जात आहे. आडत व्यापाºयांना भाजीपाला लिलावातून कमिशन मात्र चांगले मिळत आहे. या दरवाढीचा फटका सर्वसामान्य ग्राहकांनाही बसला आहे.शिमला मिरचीला सफरचंदाचा भावलॉकडाऊन नंतर भाजी बाजारात सोशल डिस्टनस् ठेवून ग्राहकांची गर्दी होत असून शिमला मिरचीला सफरचंदाचा भाव आला आहे. साधारणपणे ३० रुपये पर्यंत असणारे शिमला मिरचीच्या दरात ४० टक्के पर्यंत वाढ झाल्याचे बाजारात पहायला मिळाले.तरीही कांद्याला कुणी विचारेनागेल्या दोेन महिन्यापूर्वी कांद्याचे भाव गगनाला भिडले होते. सुमारे १५ ते २० रुपये किलो दराने मिळणारा कांदा आता दहा रुपये किलो दराने मिळू लागला आहे. त्यामुळे आता कांद्याला कुणी विचारत नसल्याचे दिसून आले. कांद्याची पूर्वी आवक मोठ्या प्रमाणात होत होती. त्यामुळे दर स्थिर होते. काही भागात झालेल्या अतिपावसामुळे साठवलेला कांदा सडू लागल्याने शेतकºयांनी बााजारात आणल्याने आवक वाढली .लसूणही ठरतोेय वरचढगेल्या दोन महिन्यांपूर्वी सुमारे ८० ते ९० रयपये किलो दराने विकला जाणारा लसूण आता तब्बल दुप्पट दराने मिळू लागला आहे. त्यामुळे बाजारात इतर भाज्यांच्या तुलनेतल लसूण वरचढ ठरत असून १४० ते १६० रुपये किलो दरान मिळत आहे.वांग्याच्या भावातही वाढगेल्या दोन महिन्यांपूर्वी केवळ १० ते २० रुपये किलो दराने मिळणारी वांगी आता दुप्पट दराने मिळू लागली आहेत. शहरातील भाजीबाजारात आज वांगी सुमारे ३० ते ४० रुपये किलो दराने मिळत आहेत. त्यामुळे ग्राहकांना भाजीपाला खरेदी करताना आथिर्क फटका बसत आहे. गावरानी वांगी मोठ्या प्रमाणात विकायलायेत आहेत.कोरोनामुळे लॉकडाऊनमुळे शहरात कळवण, सटाणा, देवळा आणि कळवण प्रिसरातून येणारा भाजीपाला काही प्रमाणात येणे कमी झाले होते. त्यामुळष भाजीपाल्याच्या दरात विक्रमी वाढ झाली होती. आता काही भाज्यांचे दर कमी झाले आहेत. - संजीव त्रिमुखे, भाजीविक्रेता,मालेगाव कॅम्पमालेगावात राज्यातील बाहेरून येणाºया येणाºया फळांची कोरोनामुळे आवक कमी झाली. फळ व्यापाºयांनी साठवून ठेवलेला माल बाजारात काढता आला नाही. त्यामुळे त्यांचे नुकसान झाले. आताा साठवणूक केलेला माल संपला आहे. यामुळे फळांचे भाव वाढले आहेत. - दिनेश श्रीखंडे , ग्राहक

टॅग्स :Nashikनाशिक