सातपूर : सातपूर गावातील रस्त्याच्या कडेला अतिक्र मण करून व्यवसाय करणाऱ्या भाजीविक्र ेत्यांना मंडईत स्थलांतरित करावे आणि रस्ता मोकळा करावा, अशी मागणी मंडईतील भाजीविक्र ेत्यांनी मनपा विभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे.सातपूर गावातील श्री छत्रपती शिवाजी महाराज मंडईत भाजीविक्रे ते व्यवसाय करतात आणि मंडई बाहेरील रस्त्याच्या दुतर्फा अतिक्र मण करून काही भाजीविक्रेते व्यवसाय करतात. या अतिक्र मणामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. भाजीविक्र ेत्यांचे अतिक्र मण हटविण्यात यावे ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थांची आहे. महापालिकेनेदेखील यापूर्वी अनेक वेळा हे अतिक्र मण हटविण्याचा दुबळा प्रयत्न केला आहे. मात्र अद्याप यश आलेले नाही.यावेळी सुनील नेहरे, योगेश गांगुर्डे, संजय गायकवाड, संदीप आव्हाड, सत्याबाई लांडगे, लीलाबाई आव्हाड, अनिता सोनवणे, शशिकला शिंदे, हिराबाई मुर्तडक, सुरेश जाधव, दत्तात्रय मोराडे, बाळासाहेब बैरागी, पंजाब भोसले, किशोर लासुरे, तानाजी निगळ, संजय काठे, मंगेश फसाळे, संजय अमृतकर, गोविंद वाणी, नारायण नेहरे, धर्मा देवरे, चंद्रिका प्रसाद, पुंडलिक नेहरे, मंगेश चव्हाण, जितेंद्र विधाते, कैलास भंदुरे आदिंसह भाजीविक्रे ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)विविध मागण्यांचे निवेदनसोमवारी मंडईतील भाजीविक्रे त्यांनीच पुढाकार घेऊन मनपा विभागीय अधिकारी राजेंद्र गोसावी यांची भेट घेऊन रस्त्यावरील भाजीविक्रे त्यांचे अतिक्र मण हटविण्याची मागणी केली आहे. या विक्र ेत्यांना मंडईत असलेल्या जागेवर कायमस्वरूपी स्थलांतरित करण्यात यावे आणि रस्ता कायमस्वरूपी मोकळा करावा. सणासाठी येणाऱ्या तात्पुरत्या विक्रे त्यांनादेखील मंडईत बसविण्यात यावे.वाहनतळाची सोय करावी. मंडईतील शौचालयाची नियमित साफसफाई करावी, पाण्याची सोय करावी यांसह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
भाजीविक्रेत्यांचे मंडईत स्थलांतर
By admin | Updated: September 27, 2016 01:35 IST