शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाला कवडीमोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 01:00 IST

सायखेडा : पाण्याची तीव्र टंचाई असतानाही शेतात पिकविलेला भाजीपाला शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने विकावा लागत असल्याने वाढत्या खर्चाने शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे. वाहतूक आणि मजुरी यासाठी ३०० रुपये प्रति क्विंटलसाठी खर्च केलेले गाजर २०० रु. प्रतिक्विंटल गेल्याने शेतकºयाला खिशातून खर्च करावा लागत आहे.

ठळक मुद्देगाजर २०० रुपये क्ंिवटल भांडवल वसूल होत नसल्याने शेतकरी हवालदिल

 

 

सायखेडा : पाण्याची तीव्र टंचाई असतानाही शेतात पिकविलेला भाजीपाला शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने विकावा लागत असल्याने वाढत्या खर्चाने शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे. वाहतूक आणि मजुरी यासाठी ३०० रुपये प्रति क्विंटलसाठी खर्च केलेले गाजर२०० रु. प्रतिक्विंटल गेल्याने शेतकºयाला खिशातून खर्च करावा लागत आहे.फेब्रुवारी महिन्यात विहिरी तळ गाठतात, पाण्याची समस्या निर्माण होते. पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. अशा वेळी आपला उदरनिर्वाह चालावा, कुटुंबाचे गुजराण चालावे, मुलांचा खर्च कुठूनतरी उपलब्ध करावा यासाठी अनेक शेतकरी पाच ते दहा गुंठे भाजीपाला शेतात करत असतात. भरउन्हात बाजारभाव मिळून चार पैसे मिळतील अशी अपेक्षा असते. मुबलक उत्पादन मिळाले नाही तरी किमान कुटुंबाचा खर्च चालवा, असे शेतकºयांना वाटत असते.आज पारंपरिक पद्धतीने शेती न करता अनेक तरुण शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतमाल पिकवतात. त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. अशा भावात भांडवलदेखील वसूल होत नसल्याने भर उन्हाळ्यात भाजीपाल्याने शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे.खर्चाचा नाही मेळ अन् खिशाला बसते झळ...शेतमाल आज कवडीमोल भावात विक्र ी होत असल्याने ऐन उन्हाळ्यात पिकासाठी केलेला खर्च वसूल होत नाही. अनेक शेतकºयांनी तर तोडणीसाठी आलेला शेतमाल शेतात सोडून दिला आहे. शिंगवे येथील शेतकºयांचे नाशिक बाजार समितीत गाजर २ प्रतिकिलो दराने विक्र ी झाले. गाजर शेतातून काढून बाजार समितीच्या आवारात आणण्यासाठी क्विंटलसाठी ३०० रु. खर्च येतो शेतकºयांना १०० रु. खिशातून द्यावे लागले तर मिरची १० रु . प्रतिकिलो विक्र ी झाल्याने खर्च वसूल होत नाही, असा कोणताच शेतमाल नाही की ज्याला चांगला भाव मिळत आहे सर्व भाजीपाला कवडीमोल भावात विकावा लागत आहे.शेतात नेमकं काय पिकवावं याचा सल्ला सरकारने द्यावा. वर्षभरात जे जे पीक केले ते कवडीमोल भावात विकावे लागले. शेतीचे उत्पन्न दुप्पट करणे दूरच राहिले. शेतकºयांना कर्ज बाजारी करून ठेवले आहे, सरकारची अनास्था, नियोजनाचा अभाव यामुळे ही वेळ आली आहे.- गोरख खालकर,माजी सरपंच, भेंडाळीउन्हाचे ४० डिग्री तपमान आणि पाण्याची टंचाई अशा परिस्थितीत पिकविलेला शेतमाल आज कवडीमोल भावात विक्र ी होत असल्याने खर्चदेखील वसूल होत नाही. तोडणी आणि वाहतुकीचा खर्च वसूल होत नाही तर भांडवल दूरच आहे. आज शेतीवर उपजीविका होऊ शकत नाही तर शेतकºयांची प्रगती दूर आहे.- दीपक डेर्ले, शेतकरी शिंगवे