शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वीरगाव : अधिकृत बसथांबा असतानाही वाहकाची मनमानी

By admin | Updated: February 18, 2015 23:58 IST

अपंग तरु णाला उतरवले घाटात

वीरगाव : येथील अपंग तरुणाला वाहक व चालकाने दमदाटी व धक्काबुक्की करत थेट वीरगावपासून ५ कि.मी. अंतरावरील ढोलबारे घाटात उतरवून देण्याचा प्रकार घडला. यामुळे प्रवाशांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या अपंग तरुणाला रात्रीच्या सुमारास पायपीट करत घर गाठावे लागल्याने परिवहन महामंडळाचा वीरगाव बसथांबा चर्चेत आला आहे.वीरगाव येथे अधिकृत बसथांबा असूनही नंदुरबार, साक्री, नवापूर, सुरत, नाशिक व मालेगाव आगाराचे चालक - वाहक या थांब्याला खो देत असल्यामुळे प्रवाशांची अडवणूक होते. साक्री आगाराच्या चालक व वाहक यांनी वीरगाव येथील अपंग प्रवाशाची अशीच अडवणूक करण्याचा प्रकार मंगळवारी रात्री घडला. काकुळते नामक अपंग तरु ण रात्री ८:३० च्या सुमारास नाशिक-साक्री बसमध्ये देवळा येथून बसला. त्यास वीरगावऐवजी ताहाराबाद येथील तिकीट देण्यात आले. बस वीरगावजवळ आली असता या तरुणाने बस थांबवण्यासाठी विनंती केली. मात्र बस वीरगावला थांबणार नाही तुला ताहाराबादलाच उतरावे लागेल असे सांगत वाहक एम.जी. राऊत यांनी नकार दिला. बस थांबविण्याची विनंती केल्यानंतर ढोलबारे घाटात निर्जनस्थळी बस थांबवून या तरु णास उतरवून देण्यात आले. या प्रकारानंतर रात्री १०या सुमारास पायपीट करून घर गाठावे लागल्याने महामंडळाच्या कारभाराबाबत प्रवाशीवर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.