शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वरी भरला वारकऱ्यांचा मेळा

By admin | Updated: February 3, 2016 21:33 IST

संतश्रेष्ठ निवृत्ती महाराज यात्रोत्सव : लाखो भाविक दाखल

 त्र्यंबकेश्वर : हरिनाम आणि टाळ-मृदंगाचा गजर करीत लाखो वारकरी बुधवारी त्र्यंबकेश्वर नगरीत दाखल झाले असून, प्रत्येकालाच संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या दर्शनाची आस लागली आहे. यात्रोत्सवानिमित्त येथे राज्यातूनच नव्हे तर परदेशातूनही भाविक दाखल झाले आहेत.आज पौष वद्य दशमीनिमित्त शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करून येथे अनेक दिंड्या विसावल्या आहेत. दिंड्या येण्यापूर्वी आपआपल्या फडावर दिंड्यांचे मंडप उभारले गेले आहेत. कीर्तन-प्रवचनासाठी ध्वनिक्षेपकांचीही सोय करण्यात आली आहे. सायंकाळी अनेक ठिकाणी प्रवचन-कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण रस्त्याने पायी जाणाऱ्या दिंड्यांमधून निवृत्ती.. नामदेव.. सोपान.. मुक्ताबाई.. एकनाथ.. नामदेव.. तुकारामांचा जयघोष ऐकू येत होता. सायंकाळपर्यंत दूरदूरच्या दिंड्या त्र्यंबकेश्वरला पोहोचल्या. विशेष म्हणजे, कृष्णा माउलींच्या दिंडीत सुमारे २५०० भाविक असून, अत्यंत शिस्तबद्ध अशी ही दिंडी आहे. दिंड्यांतील वारकरी महिला-पुरुषांमध्ये जसजसे त्र्यंबकेश्वर जवळ येईल तसतसा उत्साह संचारतो. त्र्यंबकेश्वरला आल्यावर सर्वप्रथम त्र्यंबकेश्वर मंदिरात भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन घेऊन एकादशीच्या दिवशी पहाटेच ब्रह्मगिरी परिक्रमेला जाऊन दुपारपर्यंत आपआपल्या दिंड्यांच्या फडावर परत येतात. सर्व वातावरण भक्तिभावाने फुलून गेले आहे. त्र्यंबक नगरपालिकेने यात्रोत्सवाची तयारी पूर्ण केली असून, यात्रेकरिता शहर सज्ज झाले आहे. सर्व नगरसेवक, नागरिक तयारीत गुंतले आहेत. (वार्ताहर)