शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

सेना-कॉँग्रेसच्या पुरस्कृतांना विभिन्न चिन्ह

By admin | Updated: February 9, 2017 15:52 IST

एकसमान चिन्हाची मागणी फेटाळली

नाशिक : प्रभाग तीस हा महापालिकेच्या निवडणुकीत सध्या विविध कारणास्तव चर्चेत आहे. या प्रभागातून शिवसेना, भाजपा, कॉँग्रेस या प्रमुख पक्षांसह अपक्ष उमेदवारही निवडणूक रिंगणात आहे. सेना व कॉँग्रेसच्या पुरस्कृत उमेदवारांच्या पदरी बुधवारी (दि.८) निराशा पडली. कारण एकसमान निवडणूक चिन्ह देण्याची मागणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फे टाळून लावली. यामुळे सेनेकडून पुरस्कृत मात्र अपक्ष उमेदवारी करणाऱ्या चारही उमेदवारांना स्वतंत्र चिन्ह घेत प्रचार करावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.प्रभाग तीसमध्ये वडाळागाव, पांडवनगरी, कलानगर, राजीवनगर झोपडपट्टी, श्रध्दाविहार कॉलनी, जाखडीनगर आदि परिसर येतो. या प्रभागात अनुसूचित जाती (अ), नागरिकांचा मागासवर्ग महिला (ब), सर्वसाधारण महिला (क), सर्वसाधारण (ड) असे आरक्षण आहे. या प्रभागातून कॉँग्रेसच्या एकमेव अधिकृत उमेदवार रत्ना जय कोतवाल अनुसूचित जातीमधून तर भाजपाकडून सुप्रिया खोडे, सतीश सोनवणे, श्याम बडोदे, दीपाली कुलकर्णी हे चार उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेनेच्या एकाही उमेदवाराच्या अर्जासोबत पक्षाचे एबी फॉर्म नसल्यामुळे संजय चव्हाण, रशिदा शेख, नीलेश चव्हाण, शकुंतला खोडे यांना अपक्ष म्हणून अनुक्रमे पाण्याचा जग, चहाची किटली, पाटी, नारळ असे वेगवेगळे निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आले आहे. यामुळे शिवसेनेला मोठा हादरा बसला असून, एकसमान चिन्हाची मागणीदेखील फेटाळून लावण्यात आल्याने या पुरस्कृत उमेदवारांना अपक्ष म्हणूनच निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. राष्ट्रवादी व कॉँग्रेस या पक्षांचीदेखील थोड्याफार फरकाने अशीच अवस्था असून, राष्ट्रवादीच्या पुरस्कृत उमेदवार आशाबी शेख यांच्याही उमेदवारी अर्जात त्रुटी आढळल्याने त्यांनाही अपक्ष म्हणून अंगठी या निवडणूक चिन्हाद्वारे निवडणूक लढवावी लागणार आहे. तसेच कॉँग्रेसकडून पुरस्कृत असलेले शाह नवाब अकबर यांचाही अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अपक्ष म्हणून स्वीकारल्याने त्यांना बॅट या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे. एकूणच शिवसेना व कॉँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या अर्जांमध्ये त्रुटी आढळून आल्याने त्यांना धनुष्यबाण व हाताचा पंजा या राष्ट्रीय निवडणूक चिन्हांना मुकावे लागले आहे.