शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरला पोषण अभियानानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 22:15 IST

सिन्नर : कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी शहरात शासनाच्या पोषण अभियानास सुरुवात करण्यात आली. शहर व परिसरात एक महिना हे अभियान सुरू राहणार आहे.

ठळक मुद्दे सप्टेंबर २०१९ हा पोषण माह म्हणून साजरा

सिन्नर : कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी शहरात शासनाच्या पोषण अभियानास सुरुवात करण्यात आली. शहर व परिसरात एक महिना हे अभियान सुरू राहणार आहे.महाराष्ट्र शासनाच्या वतीने सप्टेंबर २०१८ पासून पोषण अभियान यशस्वीरीत्या राबविले जात आहे. त्यामुळे राज्यातील कुपोषणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी पोषण अभियान राबविले जात असून, सप्टेंबर २०१९ हा पोषण माह म्हणून साजरा केला जात आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. इंदिरानगर येथील अंगणवाडी येथे एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या (नागरी) मुख्य सेविका मीलन गिते, शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव, आरोग्यसेविका संगीता शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पोषण माहनिमित्त जनजागृतीपर बैठक पार पडली.आपले मूल सुदृढ व आरोग्यदायी राहावे यासाठी प्रत्येक मातेने आहारात मोड आलेले कडधान्य, पालेभाज्या, फळे यांचे प्रमाण वाढवावे, असे मीलन गिते यांनी सांगितले.लहान मुलांच्या आहाराकडे प्रत्येक पालकांनी बारकाईने लक्ष द्यावे, त्यांच्या आवडीनुसार विविध खाद्यपदार्थ घरीच तयार करून द्यावेत. दुकानातील कृत्रिम खाद्यपदार्थ लहान मुलांना देऊ नयेत. जेवणापूर्वी स्वच्छ हात धुणे खूप आवश्यक आहे. हात स्वच्छ न धुतल्याने लहान मुलांत आजारपणाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जेवणापूर्वी स्वच्छ हात धुणे खूप महत्त्वाचे आहे. ज्यामुळे आपल्या कुटुंबातील आरोग्यावर होणारा खर्च निश्चितच कमीहोतो, असे अनिल जाधव यांनी सांगितले.यावेळी अनुराधा लोंढे, अंगणवाडी सेविका ललिता लोंढे, गायत्री जगझाप, हिराबाई लोणारे, ज्योती दुबे, सुनीता गोळेसर, हेमलता मिठे, रूपाली जाधव, लता रायते, मदतनीस सविता कुरणे, सुजाता देशमुख, शीला वरंदळ, प्रियांका लोणारे, नीती जाधव, ज्योती लहामगे यांच्यासह महिला व बालके मोठ्या संख्येने उपस्थित होते.