शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी शिक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रम

By admin | Updated: September 5, 2015 21:45 IST

मालेगावी शिक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रम

मालेगाव : तालुक्यासह शहरातील विविध शाळा, महाविद्यालयांत ५ सप्टेंबर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात आली. द्याने लो. व्यं. हिरे माध्यमिक विद्यालयशहरालगतच्या द्याने येथील लो. व्यं. हिरे माध्यमिक विद्यालयात अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डी. सी. डामरे होते. बी. एस. हिरे आदिंची भाषणे झाली. सूत्रसंचालन बी. डी. खैरनार यांनी केले. जळगाव (नि) गो.य. पाटील विद्यालय तालुक्यातील जळगाव (नि) येथील गो. य. पाटील विद्यालयात प्रतिमापूजन करण्यात आले. यात प्राचार्य कावेरी ढोणे, पर्यवेक्षक योगिनी गोयेकर यांचा समावेश आहे. सूत्रसंचालन शीतल देवरे हिने केले. खायदे लो. व्यं. हिरे विद्यालयतालुक्यातील खायदे येथील लो. व्यं. हिरे माध्यमिक विद्यालयात अध्यक्षस्थानी व्ही. एन. कदम होते. मान्यवरांची भाषणे झाली. सूत्रसंचालन मंजुश्री शेलार हिने केले. आभार अमोल पवार यांनी मानले. वजिरखेडे जनता विद्यालयतालुक्यातील वजिरखेडे येथील जनता विद्यालयात पायल पठाडे, गौरव पवार यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. प्रास्ताविक प्रियंका बोरसे यांनी केले. कार्यक्रमास गौरव गायकवाड, दीपिका बोरसे, प्रतीक्षा शिवरे आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन प्राजक्ता पठाडे यांनी केले. आभार वैष्णवी पाटील यांनी मानले. मळगाव केबीएच विद्यालय तालुक्यातील मळगाव येथील के. बी.एच. विद्यालयात अध्यक्षस्थानी विद्यार्थी मुख्याध्यापक विनय खैरनार होते. यावेळी प्रतिमापूजन करण्यात आले. मुख्याध्यापक बी. डी. कासार यांनी मार्गदर्शन केले. पर्यवेक्षकाचे काम संकेत कदम यांनी पाहिले. सूत्रसंचालन एम. व्ही. देवरे यांनी केले. आभार एन. के. गायकवाड यांनी मानले. पाटणे नेहरू विद्यालयतालुक्यातील पाटणे येथील प.ज. नेहरू विद्यालयात अध्यक्षस्थानी ऐवर्श्या गुंजाळ होते. प्रास्ताविक गायत्री खैरनार यांनी केले. स्नेहल खैरनार, राहुल पगार आदिंच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. मानसी आहिरे, पूजा अहेर, शीतल खैरनार, जान्हवी बागुल यांनी मनोगत व्क्त केले. सूत्रसंचालन पूनम खैरनार यांनी केले. आभार तनुजा निकम यांनी मानले. कौळाणे (गा) जि. प. शाळातालुक्यातील कौळाणे (गा) येथील जिल्हा परिषद शाळेत अविनाश शिंदे व हिलाल शिंदे यांच्याकडून दोन प्रतिमा भेट देण्यात आल्या. कार्यक्रमास शालेय समितीचे अध्यक्ष पाडुरंग पवार, तुळशीराम पवार, अनिल मोरे, भारत शिंदे, योगेश शिंदे, गंगाधर शिंदे, विजय मोरे व संजय पवार आदि उपस्थित होते. अध्यापन शिक्षक विद्यालय, कॅम्पशहरातील कै. भा. हिरे संचलित अध्यापक विद्यालयात अध्यक्षस्थानी रोशनी देवरे होती. प्राचार्य बी. टी. पवार, जे. ए. देसले आदिंनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास बी. के. ठाकरे, एस. ई. हिरे, एस. एन. देवरे, आर. आर. भावसार, संतोष वाघ, दामू पाटील, सुरेश वाणी आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन अनिता खैरनार यांनी केले. आर. बी. एच. कन्या विद्यालय, कॅम्प शहरातील आर. बी. एच. कन्या विद्यालयात विद्यार्थ्यांनी कामकाज केले. यात मुख्याध्यापिका नेहा मांडवडे, उपमुख्याध्यापिका युगल शेवाळे, पर्यवेक्षिका स्नेहल पवार यांचा समावेश आहे. प्राचार्या एम. आर. हिरे, उपप्राचार्य बी. वाय. पाटील, ए. जे. जोंधळे, आर. जी. पाटील, एल. टी. पाटील, डी. एस. रत्नपारखी, पी. एस. शेवाळे आदि उपस्थित होते. काबरा विद्यालय, मालेगाव येथील ल. रा. काबरा विद्यालयात शुभांगी देशमुख मुख्याध्यापिका, निशितोष सरदेसाई व पीयूष सोनवणे यांनी पर्यवेक्षकाची भूमिका बजावली. यावेळी देवकिसन बडाळे, रघुवीर पाटोदिया, भरत तापडिया, ओमप्रकाश सारडा, गोविंद नारायण तोतला आदि प्रमुख पाहुणे होते. सूत्रसंचालन ममता सोनवणे, वैष्णवी शिंदे, रश्मी शिंदे यांनी केले. आभार ए. पी. पाटील यांनी मानले.वर्धमान शिक्षण संस्था, मालेगावयेथील वर्धमान शिक्षण संस्थेच्या र. वी. शाह, वर्धमान उच्च माध्यमिक व कां. रं. शाह विद्यालयात अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रमेशचंद्र शाह होते. यावेळी सचिव प्रताप शाह, सहसचिव गौतम शाह प्रमुख पाहुणे होते. जी.डी.ए.बी महाविद्यालय येथील जी.डी.ए.बी. महाविद्यालयात अध्यक्षस्थानी नजिरी रजी अख्तर होत्या. रा. सी. हाले व डॉ. अरिफ अन्सारी प्रमुख पाहुणे होते. यावेळी रिझवाना हमदानी, जिहार रहमान आदिंसह शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. कर्मवीर या. ना. जाधव विद्यालय येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एच. एस. वाघ होते. विद्यार्थ्यांनी शिक्षकी वेशभूषा सादर केली. प्राचार्य वाघ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पर्यवेक्षक बी. एस. महाले यांच्यासह सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.मराठी अध्यापक विद्यालय, कॅम्पयेथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डी. झेड. पाटील होते. आकांक्षा गांगुर्डेने मुख्याध्यापक तर हर्षद बच्छाव यांनी उपमुख्याध्यापक म्हणून कामकाज पाहिले. सूत्रसंचालन शुभांगी देशमुख हिने केले. सायली अहिरेने आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी प्रा. श्रीमती मंगला पाटील, व्ही.डी. सोनवणे, प्रा.व्ही. बी. मगरे, पी. ई. पाटील आदि शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. राजीव गांधी इंटरनॅशनल स्कूल दाभाडी शिवारयेथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनीता अहिरे होत्या. यावेळी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. (वार्ताहर)