शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

महिला दिनानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 00:08 IST

नाशिक : जिल्ह्यात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यासह विविध उपक्रम राबविण्यात आले.

ठळक मुद्दे महिलांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आलादेशात मुलींचे घटते प्रमाण चिंताजनक

नाशिक : जिल्ह्यात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यासह विविध उपक्रम राबविण्यात आले. सिन्नर येथील माध्यमिक लोकशिक्षण मंडळाच्या माध्यमिक विभाग व इंग्रजी विभागात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष अण्णासाहेब गडाख होते. व्यासपीठावर रघुनाथ एरंडे, माधव शिंदे, शिवाजी गाडेकर, विलास सातपुते आदी उपस्थित होते. यावेळी संजीवनी गजभार, चंद्रकला साळुंखे, पुष्पा जाधव, गीतांजली भवर, शीतल उशीर, प्रियंका देवकर, रोहिणी तुपे, वैशाली कोळपे, तब्बसुम शेख, मोनाली कुलकर्णी, सुवर्णा सातपुते, वर्षा खैरनार आदी महिलांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. महाराष्ट्रासह देशात मुलींचे घटते प्रमाण चिंताजनक आहे. स्त्रीभ्रूण हत्या ही गंभीर समस्या आहे, हे प्रकार थांबले पाहिजेत असे प्रियंका देवकर यांनी व्यक्त केले. प्रवीण सोमवंशी यांनी सूत्रसंचालन केले. सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या पुंजाजी रामजी भोर विद्यालय व डॉ. अण्णासाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालयात महिलांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.सरपंच सीमा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रकला कांगणे, ग्रामपंचायत सदस्य अनिता आव्हाड, पी. बी. थोरात, एम. पी. शिरसाठ, एस. ओ. सोनवणे, शारदा सरवार आदी उपस्थित होते. यावेळी व्ही. एस. कवडे, एस. पी. शिरसाठ, एस. ओ. सोनवणे, पी. बी. थोरात आदींनी महिला दिन का व केव्हापासून साजरा करता व कसा साजरा करावा याच्याविषयी सविस्तर माहिती सांगितली. भोर विद्यालयाच्या वतीने सरपंच सीमा शिंदे, शिवगौरी कृषिसेवा केंद्राच्या संचालक चंद्रकला कांगणे व ग्रामपंचायत सदस्य अनिता आव्हाड यांचा विद्यालयाच्या वतीने ेसत्कार करण्यात आला. यावेळी सांस्कृतिक विभागप्रमुख पी. बी. थोरात यांनी उपस्थित महिलादिनावर आधारित ‘होतीस तू’ ही कविता सादर केली. पी. बी. थोरात यांनी सूत्रसंचालन केले.