शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

यात्रोत्सवात विविध कार्यक्रमांची रेलचेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 00:46 IST

महाशिवरात्रीनिमित्त यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यात्रेचे प्रमुख आकर्षण असलेल्या करमणुकीच्या कार्यक्रमांमध्ये ‘अप्सरा आली’ या महाराष्टÑाची लोकधारा जोपासणाऱ्या कार्यक्रमाने मनमाडकरांना मंत्रमुग्ध केले. तकतरावपासून ते हजेरीपर्यंतच्या सादरीकरणाने यात्रोत्सवात रंगत आणली.

ठळक मुद्देमनमाडकर मंत्रमुग्ध : महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी गर्दी

मनमाड : येथे महाशिवरात्रीनिमित्त यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यात्रेचे प्रमुख आकर्षण असलेल्या करमणुकीच्या कार्यक्रमांमध्ये ‘अप्सरा आली’ या महाराष्टÑाची लोकधारा जोपासणाऱ्या कार्यक्रमाने मनमाडकरांना मंत्रमुग्ध केले. तकतरावपासून ते हजेरीपर्यंतच्या सादरीकरणाने यात्रोत्सवात रंगत आणली.शहरात आजही पारंपरिक पद्धतीने व रितीरिवाजानुसार महाशिवरात्रीनिमित्त यात्रोत्सव साजरा करण्याची प्रथा टिकून आहे. यात्रा कमिटीचे अध्यक्ष अशोक सानप उपाध्यक्ष सतीशसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिरातील विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच गवळी वाड्यातून कावड्यांची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी शहराच्या विविध भागातून काढण्यात आलेल्या तकतरावच्या मिरवणुकीचा समारोप गांधी चौकात करण्यात आला. दहेगाव येथील तकतरावला पहिला मान देण्याची प्रथा पूर्वीपासून सुरू आहे.यात्रेचे प्रमुख आकर्षण असलेल्या करमणुकीच्या कार्यक्रमांत एकात्मता चौकात ‘अप्सरा आली’ या मराठी-हिंंदी नृत्यगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रंगमंचाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. श्री गणेशवंदनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली.या कार्यक्रमात सादर करण्यात आलेल्या मराठी लावण्यांसह हिंदी गीतांवर मनमाडकरांची पावले थिरकली. मनोरंजनाबरोबरच जनजागृतीपर विनोदी नाटिका सादर करण्यात आल्या.सकाळी तलाठी कार्यालयासमोर हजेरीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात्रोत्सवाच्या यशस्वीतेसाठी यात्रा कमिटीचे अध्यक्ष सानप, उपाध्यक्ष सतीशसिंग परदेशी, रवि इपर, ईश्वर पाटील, गोटू केकाण, अनिल देवरे, अकबर सोनावाला, अनिल दराडे, भाऊ हरबा गवळी, सलीम सोनावाला, पारीख बाबूजी, ज्ञानेश्वर नागापुरे, सुनील गवळी, लाला नागरे यांच्यासह सदस्यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रम