कळवण : आरकेएम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळवण येथे गुरुवारी (दि.८) जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. चित्रकला, वक्तृत्व व निबंध आदी कार्यक्रमांनी महिला दिनाच्या कार्यक्र मात रंगत भरली. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला प्राचार्य एच. के. शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार वाहण्यात आला. आरकेएम माध्यमिक विद्यालयात दरवर्षी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. यंदाही मोठ्या उत्साहाने शेकडो विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला. निबंध, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन उपप्राचार्य सी. आर. गांगुर्डे व उपमुख्याध्यापक एल.डी. पगार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एन. डी. देवरे, जे. आर. जाधव उपस्थित होते. यावेळी संजिता बोरसे, नीता निकम, गीतांजली निरगुडे, प्रणाली नेरकर, बी.एस. गिते यांनी जागतिक महिला दिनानिमित्त आजची स्त्री, नवीन आव्हान पेलण्याची शक्ती, बदलते सांस्कृतिक जीवन, बदलती कार्यशक्ती, बदलते वास्तविक मूल्य, मैत्रीय भाव याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षिका उज्ज्वला पाटील, मीना सिद्धपुरे, मंगला पगार, आशा साळवे, संगीता जगताप, अरु णा गावीत, धनश्री गांगुर्डे, संजिता बोरसे, लीना पाटील, भावना पगार, सुनीता आहेर, सोनाली गांगुर्डे, प्रणाली नेरकर, नीता निकम आदी उपस्थित होते.
आरकेएम विद्यालयात विविध स्पर्धा कळवण : महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 00:09 IST