शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

बुद्ध पौर्णिमेनिमित्त आज शहरात विविध कार्यक्रम

By admin | Updated: May 10, 2017 01:00 IST

पाथर्डी फाटा : भगवान गौतम बुद्ध यांचा जन्मदिवस अर्थात बुद्ध पौर्णिमेनिमित्त शहरात विविध सांस्कृतिक तसेच धम्म कार्याचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथर्डी फाटा : भगवान गौतम बुद्ध यांचा जन्मदिवस अर्थात बुद्ध पौर्णिमेनिमित्त शहरात विविध सांस्कृतिक तसेच धम्म कार्याचे आयोजन करण्यात आले आहे. पांडवलेणी येथील बुद्ध स्मारकात कार्यक्रम होणार आहेत.  उपासकांना दिवसभर या कार्यक्रमाचा लाभ घेता येणार आहे. संयोजक भन्ते सुगत यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी १० वाजता धम्म ध्वजारोहणाने कार्यक्रमांचा प्रारंभ होईल. त्यानंतर स्मारकात भिक्खू संघाच्या वतीने बौद्ध पूजा पाठ होईल. साडेदहा वाजता रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. दुपारी स्मारक परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. १२ वाजता भिक्खू संघास भोजनदान दिले जाईल.  दुपारी ४ वाजता शालिमार येथील डॉ. आंबेडकर पुतळ्यापासून भगवान बुद्धांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येणार आहे. एमजी रोड, सीबीएस, त्र्यंबक नाका, सातपूर, स्वारबाबानगर, त्रिमूर्ती चौक, पाथर्डीफाटा मार्गे मिरवणूक बुद्ध स्मारकात येणार असून, तेथे मिरवणुकीचा समारोप होईल. सायंकाळी साडेसहा ते साडेसात दरम्यान धम्म सभा, नंतर रूपेश निकाळजे प्रस्तुत क्र ांतीचा साक्षीदार हे महानाट्य सादर केले जाणार आहे. याशिवाय उपनगरांमध्येही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.दरम्यान, बुद्ध जयंती महोत्सवानिमित्त बुद्ध स्मारकास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. बुद्ध वंदनेसाठी येणाऱ्या उपासकांसाठी महापालिकेच्या वतीने विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. विविध सामाजिक संघटनांचे स्टॉल्स् लावण्यात येणार आहे.