शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

महावीर जयंतीनिमित्त विविध उपक्रम

By admin | Updated: April 10, 2017 00:54 IST

येवला : येथे भगवान महावीर यांची जयंती विविध कार्यक्रमांनी संपन्न झाली

येवला : येथे भगवान महावीर यांची जयंती विविध कार्यक्रमांनी संपन्न झाली. येथील जैन मंदिरात भगवान महावीरांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला. समाजबांधवांच्या वतीने चांदीच्या सजवलेल्या पालखीतून महावीरांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. पटणीगल्ली, शिंपीगल्ली, मेनरोड सराफ फाटा, बालाजीगल्ली, नगरपालिका रोडमार्गे मिरवणूक नेण्यात आली. मिरवणुकीदरम्यान ‘त्रिशलानंदन वीर की जय, बोलो महावीर की जय आज का दिन कैसा है सोने से भी महेंगा है, वंदे वीरम, जय बोलो महावीर भगवान स्वामी की जय’चा जयघोष करण्यात आला. मिरवणूक मार्गात भाविकांनी विविध रांगोळ्या काढल्या होत्या. अनेक ठिकाणी फुलांच्या वर्षावात पालखीचे स्वागत करण्यात आले. अनेक महिलांनी पालखीचे पूजन (गऊळी) केले. जैन मंदिरात विशेष कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. शेखर पटणी यांनी प्रास्ताविक केले. निराली पटणी, दर्शन पटणी, हार्दिक पटणी, परम पटणी, हेत्वी पटणी, रिपल पटणी, देशना लोढा, प्रियल पटणी आदि विद्यार्थ्यांनी महावीर भगवान यांच्या जीवनावर भाषणे केली. धनंजय कुलकर्णी, विजय श्रीश्रीमाळ, दत्ता महाले यांचीही भाषणे झाली. त्यांनी सांगितले की, भगवान महावीर यांचे तत्त्वज्ञान आणि आदर्शावर जगाची नौका चालू असून, महावीरांनी दिलेली त्रिसूत्री आणि अनेकांदवादाचे तत्त्वज्ञान जगाला उपयुक्त ठरत असे सांगून कर्मसिद्धांताची महती विशद केली.हेत्वी पटणी, निराली पटणी, राज्वी पटणी, परम पटणी, निमश्व पटणी, जिनांग पटणी, हिरल पटणी यांनी भगवान महावीरांच्या भक्तिगीतावर सुंदर नृत्य सादर केले.ओस्तवाल जैन स्थानकात येवला जैन समाजाचे २४ वे तिर्थंकर भगवान महावीर स्वामी यांच्या जन्मोत्सवनिमित्य समरथगच्छधिपती प. पू. १००८ उत्तमचंदजी म. सा. आणि प. पू. विमलकंवरजी म.सा. यांच्या शिष्या प. पू. दर्शनाजी म.सा. आदिंनी आपल्या मधुर वाणीतून महावीरांची महती विशद केली.मिरवणुकीत मारवाडी गुजराथी मंचचे अध्यक्ष अल्केश कासलीवाल, ओस्तवाल समाज अध्यक्ष विजयकुमार श्रीश्रीमाळ, उपनगराध्यक्ष सुरज पटणी सुभाष समदडिया, गुलाबराव महाले, मनोज कासलीवाल, पवन पहाडे, राजेश भंडारी, धनंजय कुलकर्णी, अनिल मंडलेचा, सतीश समदडिया, अभय पटणी, अमित पटणी, शेखर मेहता, मनीष काबरा, सतीश समदडिया, अमित पटणी, दत्ता महाले, प्रितम पटणी, प्रवीण श्रीश्रीमाळ, अभय पटणी, अनिल मुथा, अनिल मंडलेचा, विलास पटणी, सतीश पटणी रोशन भंडारी मदन चंडालिया, सुरेश पटणी, सुरेश बंब, हर्षल पारख, सुभाष लोढा, रवींद्र बाफना, स्नेहल पटणी, सुहास पटणी, जगदीश पटणी, पोपटलाल पटणी, सचिन कासलीवाल यांच्यासह जैन व जैनेत्तर बांधव महिला युवक-युवती उपस्थित होते. गोतमी प्रसादीचे आयोजन करण्यात आले होते.इगतपुरी येथे महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील खालची पेठ येथील जैनस्थानकापासून महावीरांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली होती. वरची पेठ येथील जैनस्थानक येथे मिरवणुकीचा समारोप झाला. शहरातील खालची पेठ येथून मेनरोड, तीनलकडी, बालाजी मंदिरपासून काढलेल्या मिरवणुकीत अहिंसा परमोधर्म:, जय जिनेंद्र यासह त्रिशलानंदन वीर की जय बोलो, महावीर की जय या जयघोषांनी परिसर दुमदुमन गेला होता. वरची पेठ येथील जैनस्थानकात मुख्य कार्यक्रम झाला. चिमुकल्यांनी गीते सादर केली. यावेळी महावीरांच्या जीवनचरित्रावर व्याख्यान झाले.इगतपुरी जैन बांधवाच्या वतीने चिंचलै खैरे या आदिवासी भागात सर्वरोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात एकूण ७५ रुग्णांनी सहभाग घेतला. रविवारी वरची पेठ येथील जैनस्थानकात रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ५१ महिला व पुरुष रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी संघपती प्रकाश टाटिया, मनसुखलाल लुणावत, सुभाष लुणावत, पोपटशेठ लुणावत, प्रकाश छाजेड, पुरणचंद लुणावत, सुरेश चोपडा, अशोक लुणावत, मोहनलाल बाफना, अजित पारख, शांतिलाल लुणावत, पूनमचंद बाफणा, अजित लुणावत, शांतीलाल संचेती, संदीप लुणावत, अजित बाफणा, राजेश मेहता, मोहनलाल चोरडिया, अजय लुणावत, डॉ. सचिन मुथा, हितेश चोरडिया, नरेंद्र सेठी, संजय चोपडा, प्रकाश मुथा, अभय लुणावत, अभय भन्साळी, सुरेश छाजेड, रमेश समदडिया, संजय बाठिया, बाळूशेठ समदडिया, सुभाष समदडिया, हुकूमचंद श्रीश्रीमाळ, संदीप कोचर, योगेश लुणावत, संतोष बाफना, राजेश जैन, योगेश चोपडा, आशिष चोरडिया, संतोष टाक आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी येथील जैनस्थानकात भगवान महावीर जयंती निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. महेश श्रीश्रीमाळ यांनी सूत्रसंचालन केले. (लोकमत चमू)